Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये पोलिसांच्या ड्युटीचे तास वाढवले; हे आहे कारण...

नाशिकमध्ये पोलिसांच्या ड्युटीचे तास वाढवले; हे आहे कारण…

नाशिक । प्रतिनिधी

पोलिसांमध्ये करोना रूग्णांची होणारी वाढ, क्वारंनटाईनचे वाढते प्रमाण, गणेशोत्सव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असलेले फिक्स पाँईट्स या सर्व पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाने कर्मचार्‍यांची कामकाजाची वेळ पुन्हा चार तासांनी वाढविल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील पोलीसांची कामकाजाची वेळ 8 तास करण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवासह इतर कारणांनी ही वेळ पुन्हा 12 तास करण्यात आली आहे. हा तात्पुरता पर्याय असून, यातून बीट मार्शलांना सुट देण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर लागलीच कर्मचार्‍यांच्या कामाचे तास आठ तासापर्यंत आणण्याचे धोरण आखले.

मध्यरात्री ड्युटी करणार्‍या बीट मार्शलांना तर अगदीच सहा तासांचे काम सोपविण्यात आले. हा बदल कर्मचार्‍यांना फायदेशीर ठरत होता तसेच यामुळे कर्मचारी सुखावले होते. मात्र, काही दिवसांपासून वेळेच गणित बसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या.

करोना, गणेशोत्सव बंदोबस्त, लॉकडाऊन नियमांनुसार फिक्स पाँईट्स, बॉर्डर सिलींग ही कामे सुरू आहेत. आजारीपणाच्या रजा आणि 50 वर्षांपुढील कर्मचार्‍यांना कमी जोखमीचे कामे देण्यात येतात.

दुसरीकडे करोनामुळे कर्मचारी क्वारंनटाईन होत आहे. यामुळे कामाचे नियोजन करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर बीट मार्शल वगळून इतर सर्व कर्मचार्‍यांच्या कामांचे तास वाढविण्यात आले आहे.

अर्थात ही परिस्थिती कायम राहणार नाही. परिस्थिती सर्वसामान्य झाली की कर्मचार्‍यांना पुन्हा आठ तासांची ड्युटी देण्यात येईल, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या