Sunday, October 4, 2026
HomeनाशिकNashik Police News : नाशिकला तीन नवे 'एसीपी'; आज होणार हजर,...

Nashik Police News : नाशिकला तीन नवे ‘एसीपी’; आज होणार हजर, अनुभवी अधिकाऱ्यांना मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थाचा पूर्वानुभव लक्षात घेता शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांना (एसीपी) मुदतवाढ (Extension) देण्यात आली असून, इतर विभागांतून आणखी तिघांची नाशिक शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. हे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त सोमवारी (दि. २९) आयुक्तालयात हजर होण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी नाशिकमध्ये (Nashik) अनुभवी फौज तैनात ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.

- Advertisement -

राज्य गृह विभागाच्या आदेशानुसार, नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील (Rural Police Force) काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय, नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी शहरातील २५० पेक्षा जास्त पोलीस अंमलदार आणि ६० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी मुदतवाढीचे ‘बक्षीस’ दिले आहे. यामुळे सिंहस्थाच्या काळात नाशिकचा एकूणच पोलीस बंदोबस्त मजबूत आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात राहणार आहे.

शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची पदोन्नतीने शहरातच ‘एसीपी’ पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, गृह गृह विभागाने विभागाने (Home Department) सुधारित आदेश जारी केल्याने माछरे यांची बुलढाणा येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता प्रमोद वाघ यांची वर्णी लागली आहे. तर, शहरात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या तिघांपैकी दोघे थेट ‘एसीपी’ असून, एकजण पदोन्नतीने ‘एसीपी’ झाले आहेत. सध्या

निकम यांना ‘साइड पोस्टिंग’ मिळणार ?

सध्या नाशिकरोड विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त संगीता निकम या लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सिंहस्थाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने त्यांना ‘साइड पोस्टिंग’ देऊन, नवनियुक्त तिन्ही अधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहातील (महत्त्वाचा) पदभार दिला जाणार का, याकडे पोलीस आयुक्तालयाचे लक्ष वेधले गेले आहे.

‘अपेक्षित पोस्टिंग’ कोणती?

नाशिक पोलीस दलात मुख्यालय, सरकारवाडा आणि विशेष शाखा ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या नवनियुक्त अधिकाऱ्यांना सिंहस्थापूर्वी कोणती ‘अपेक्षित पोस्टिंग’ मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवनियुक्त अधिकारी

१. माधव रेड्डी: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर अधीक्षक.
२. पूनम पाटीलः अकोला येथील उपअधीक्षक.
३. प्रमोद वाघः वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून पदोन्नती

सद्यस्थितीतील पदभार

शेखर देशमुख – पंचवटी विभाग, सरकारवाडा (अतिरिक्त)
डॉ. सचिन बारी – अंबड विभाग
संदीप मिटके – गुन्हे, विशेष शाखा (अतिरिक्त), मुख्यालय (अतिरिक्त)
अद्विता शिंदे – वाहतूक विभाग
संगीता निकम – नाशिकरोड विभाग

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा संकलित मूल्यमापन चाचणी लांबणीवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी-1 नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन...