Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : खेळ मांडला…बदल्यांचा! उपायुक्त जाधवांनंतर आयपीएस म्हस्केंचाही नाशिकला नकार

Nashik News : खेळ मांडला…बदल्यांचा! उपायुक्त जाधवांनंतर आयपीएस म्हस्केंचाही नाशिकला नकार

अमरावतीच्या किरिथिका येणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाच्या गृहविभागाकडून (Home Department) उघड उघड अपेक्षित बदल्यांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने जणू काही त्याचा बाजार मांडल्याचे सध्या निर्गमित होणाऱ्या बदल्या, सुधारित बदल्या व विद्यमान बदल्यांचा आदेशांवरुन (Order) दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अपेक्षित जागी बदली होत नसल्याने अधिकाऱ्यांकडून सेटिंग्ज व ‘लॉबिंग’ साठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे शहर पोलीस दलातील (City Police Force) एका उपायुक्त पदासाठीच्या रिक्त जागेसंदर्भात चौथ्यांदा फेरबदलाचे आदेश जारी झाले. दरम्यान, शहर गुन्हे उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन ठवड्यापूर्वी गृहविभागाने उपायुक्त पदावरील बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात नाशिकचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांची कोल्हापूर (Kolhapur) येथे नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी तर, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. तर, मुंबईतून (Mumbai) योगेश चव्हाण व धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची नाशिकला उपायुक्त म्हणून आदेश जारी झाले. आठवडा संपताच, पुन्हा नवीन आदेश आले आणि त्यात बच्छाव यांची नाशिक नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी तर, योगेश चव्हाण यांची मुंबईत राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी सुधारित आदेश आले.

YouTube video player

मंगळवारी (दि. ८) दुपारी गृहविभागाने नवीन आदेश जारी करुन नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी व आयपीएस अनिल म्हस्के यांची पदोन्नतीने नाशिकला उपायुक्तपदी (Deputy Commissioner) बदली केली. या आदेशाला २४ तास होत नाही तोच, बुधवारी (दि. ९) नवीन आदेश जारी झाले. त्यानुसार म्हस्के यांची नागपूर ग्रामीणलाच अपर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर, अमरावतीच्या उपायुक्त किरिथिका (कृतिका) सी. एम. यांची नाशिकला उपायुक्त म्हणून बदलीचे आदेश जारी झाले आहेत. त्यांना नाशिकमध्ये कोणत्या विभागाची जबाबदारी मिळणार हे समोर आले नसून त्या आयुक्तालयात हजर होणार की आणखी चौथा आदेश जारी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे पदस्थापनांचे आदेश जारी होत असले, तरी पदभार स्वीकारेपर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा ‘खो-खो’ थांबणार नसल्याचे सध्या दिसत आहे.

झोन एक व दोन यांना मुदतवाढ?

धुळे (Dhule) अपर अधीक्षक पदावरुन किशोर काळे हे मंगळवारी (दि. ९) नाशिक शहरात उपायुक्त पदावर हजर झाले आहेत. यासह नाशिक शहर परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांना नाशिकमध्ये मुदतवाढ मिळाल्याचे समजते. दरम्यान, पंचवटी व वाहतूक विभागाची जबाबदारी असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा चव्हाण यांची नव्याने नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे.

सिंहस्थ डोळ्यांसमोर ठेऊन जबाबदाऱ्या

किरिथिका या सन २०२० च्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असून, त्यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ३८२ रैंक पटकावली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी म्हस्के यांची नाशिक शहरात बदली झाल्यानंतर सायंकाळीच त्यांच्या फेरनियुक्तीसंदर्भात चर्चा सुरू झाली. नांदेड येथून किरिथिका यांना नाशिक शहरात नेमण्यासंदर्भात प्रयत्न सुरू झाले. म्हस्के यांनी यापूर्वी नागपूर ग्रामीणमध्ये कामकाज केल्याने त्यांनी तिथेच पदोन्नतीला पसंती दिल्याचे कळते. त्यातच किरिथिका यांना सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नेमण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...