नाशिक | भारत पगारे | Nashik
शहरातील पोलिसिंग आता केवळ सायरन आणि गाडीपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते थेट डिजिटलायझेशनच्या श्रेणीत मोडले आहे. ‘सुरक्षित नाशिक ‘मोहिमेअंतर्गत (Nashik Police) सुरू करण्यात आलेल्या ग्राउड पोलिस प्रेझेन्स सिस्टिममुळे शहरातील तब्बल १ हजार १७० ठिकाणे गस्तीच्या कक्षेत आली आहेत. यापैकी ३८४ स्थळांना त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला ‘अतिमहत्त्वाचे’ असा दर्जा देत आहे. गुन्हेगारी, संवेदनशीलता आणि नागरिकांच्या तक्रारी यांचा अभ्यास करून ही वर्गचारी निश्चित करण्यात आली आहे.
सन २०२४ पासून राबविल्या जाणान्या या उपक्रमात गस्त केवळ ‘नोंदीत’ नसून ती प्रत्यक्ष उपस्थितीत दिसावी, हा उद्देश आहे. प्रत्येक पथकाला ‘पोलीस प्रेझेन्स अॅप’द्वारे निश्चित ठिकाणी जाऊन उपस्थिती नोंदवावी लागते. संबंधित ठिकाणी पोहोचल्यावरच ‘जीपीएस’ सक्रिय होते. काढलेला फोटो एआयद्वारे (AI) तपासला जातो आणि पडताळणीनंतरच नकाशावर हिरवे चिन्ह उमटते. त्यामुळे गस्तीचे ठिकाण टाळण्यास ‘बाव’ उरलेला नाही.
दरम्यान, गस्तीचे नियंत्रण पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांकडे आहे. साप्ताहिक आढावा थेट आयुक्तांकडे सादर होतो. सण, उत्सव, मोठे कार्यक्रम किया विशिष्ट घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नकाशातील ठिकाणांत तातडीने बदल केले जातात. नागरिकांनाही संशयास्पद किंवा उपद्रवी ठिकाणे वेबसाइटवरून सुचविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या हायटेक गस्तीमुळे शहरातील पोलिसिंग दृश्यस्वरुपात जाणवते आहे.
पोलीस प्रेझेन्स अॅप’ द्वारे एआय आधारित गस्त सुरू आहे. नागरिकांनी सुचवलेल्या ठिकाणांचाही पडताळणीअंती समावेश करीत आहोत.
संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त
ठळक वैशिष्ट्ये
- प्रतिसाद वेळ सरासरी पाच मिनिटांपर्यंत
- बीट मार्शलपासून डीसीपी-एसीपींपर्यंत सर्वांकडेच अॅप
- पायी गस्तीची स्वतंत्र नोंद
- आयुक्तालय हद्दीच्या सीमारेषेपर्यंत मॅपिंग
वर्गवारीनिहाय ठिकाणे
- अतिमहत्त्वाचे – ३८४
- सर्वसामान्य – १,१७०
- नागरिक सूचित – ३९
- इतर – ३६
गस्तीचा विस्तार
| मंदिरे | २४२ | एटीएम | २७ |
| चौक | १३० | पेट्रोलपंप | २६ |
| शाळा | ११५ | महाविद्यालये | २४ |
| सोसायट्या | २८ | बाजारपेठ | २२ |
| मशिदी | ५६ | पुतळे | १८ |
| बँका | ५० | बसथांबे | १४ |
| उद्याने | ४९ | कंपन्या | १३ |
| रुग्णालये | ३४ | लॉन्स | ११ |
| हॉटेल्स | २८ | हॉल्स | ११ |
| दुकाने | ६३ | सीसीटीव्ही चौक | १० |





