Monday, July 6, 2026
Homeक्राईमNashik News: 'धनदांडगे' तळीराम कचाट्यात; रस्त्यातच वाहने उभी करणं भोवलं, 'एवढ्यांवर' थेट...

Nashik News: ‘धनदांडगे’ तळीराम कचाट्यात; रस्त्यातच वाहने उभी करणं भोवलं, ‘एवढ्यांवर’ थेट गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील अनेक मद्यालयांसह बार बाहेरील भरस्त्यात मनमर्जी कार उभ्या करून सार्वजनिक वाहतुकीसह मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या धनदांडग्या तळीरामांवर थेट भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी मंगळवारी रात्री अचानक ही कारवाई करीत सोळा कारचालकांवर गुन्हे नोंदविले. ही कारवाई यापुढेही सकाळी व संध्याकाळी या दोन सत्रांत सुरुच राहणार आहे.

शहरात नोव्हेंबर महिन्यात भरधाव ट्रकमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यावर शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यास सुरूवात केली होती. मात्र, गंगापूर रोडवरील प्रमुख मद्य दुकानांबाहेर चारचाकी व रिक्षा चालकांकडून करण्यात येणाऱ्या अनियमित पार्किंगमुळे नियमित वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत पोलिसांनी कठोर कारवाईचे अस्त्र उगारत विशेष मोहीम राबवली. हा परिसर सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण असलेला मार्ग आहे. परंतु, मद्यविक्री व बारबाहेर बहुतांश ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला नव्हे तर थेट मुख्य रस्त्यात उभी करत असल्याने वाहतूक ठप्प होत होती. दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनचालकांना वळसा घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी पादचारी मार्गही अडत होता.

- Advertisement -

पोलिसांनी पाहणी केल्यावर वाहनचालक बेदरकारपणे रस्ता अडवून मद्य खरेदीसाठी थांबत असल्याचे आढळले. त्यानंतर अचानक धडाकेबाज मोहीम राबवून अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमबाह्य पार्किंग, रस्त्यावरील अडथळा निर्मिती आणि वाहतुकीस धोका निर्माण केल्याप्रकरणी कलमानुसार ई-चलन धाडण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...