Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित

Nashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित

'इतक्या' लाखांचा दंड वसूल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या निर्देशानुसार शनिवारी (दि.३) व रविवारी (दि.४) रात्री ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत १८ मद्यपी वाहन चालकांवर (Drunk Drivers) कारवाई करून दावे नाशिकराेड मोटार वाहन न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस

न्यायालयाने (Court) १८ खटल्यांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ८० हजार रुपये दंड आकारणी केली. दरम्यान, १८ मद्यपी वाहनचालकांचे लायसेन्स निलंबित करण्यासाठी सिटी ट्रॅफिक ब्रान्चने आरटीओला अहवाल पाठविला आहे. पोलीस आयुक्तालयहद्दीमध्ये गटारी अमावस्याच्या निमित्ताने नाशिक शहरात (Nashik City) मद्यपान करून वाहन चालविणार्‍या चालकांवर कारवाई करण्यासंदर्भात कर्णिक यांनी निर्देश दिले हाेते.

हे देखील वाचा : Nashik News : खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

त्यानुसार वाहतूक आणि मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी व सहायक आयुक्त सुधाकर सुरडकर(वाहतूक) यांच्या मार्गदर्शानाखाली मद्यपि चालकांविरुध्द मोहीम राबविण्यात आली. यात सर्व पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेने विविध पाॅईंटवर नाकाबंदी करत ब्रेथ ऑनालायझरद्वारे मद्यपिंची तपासणी केली. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः मोहिमेत उतरुन चालकांना समज दिली.

हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला; हॉटेलात ८ जणांना जिवंत जाळलं

कारवाईचे सातत्य टिकविणार

शहरातील वाढते रस्ते अपघात, तसेच अपघातातील जखमी व प्राणहानी टाळण्यासाठी मद्यपी वाहन चालकांविरूध्द ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कारवाई मोहीम यापुढेही सतत राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन सिटी ट्रॅफिक ब्रान्चचे सहायक पाेलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांनी केले आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...