Friday, November 22, 2024
Homeनाशिकलाडक्या बाप्पाला वाजत गाजत देणार निरोप! नाशिक पोलिसांची मंडळांवर राहणार नजर

लाडक्या बाप्पाला वाजत गाजत देणार निरोप! नाशिक पोलिसांची मंडळांवर राहणार नजर

नाशिक | प्रतिनिधी
भद्रकालीतील वाकडी बारव येथून उद्या, मंगळवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीत लेझर, गुलाल आणि डीजे नसावा, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी मंडळांना दिली आहे. दरम्यान, नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. शहरात विसर्जनासाठी तीन हजार पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री दीडपर्यंत तैनात राहणार आहे. सोबतच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना पोलिसांनी आखल्या आहेत.

शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, सर्व पोलीस ठाणे, विविध विभाग आणि पथकांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस दलातही अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अपर अधीक्षकांना बंदोबस्त नेमण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मिरवणूक मार्गासह मंडळांसमवेत बंदोबस्त नेमला आहे. यासह गणेशमूर्ती विसर्जन स्थळे, मुख्य व उपनगरातील मिरवणुकांच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त असेल. मूर्तिदान व परिस्थितीचे अपडेट प्रत्येक तासाने नियंत्रण कक्षात कळविण्यात येतील.

- Advertisement -

बंदोबस्तातील मनुष्यबळ
उपायुक्त : ४
सहायक आयुक्त : ७
वरिष्ठ निरीक्षक : ५९ सहायक
निरीक्षक : ६७
उपनिरीक्षक : १२७
अंमलदार : ३,००० (दोन शिफ्टमध्ये)
होमगार्ड : १ हजार
लेझर लावलेले वाहन मिरवणुकीत बाहेर काढणार
मिरवणूक मार्गाभोवती बॅरिकेडिंग; स्वागत कक्षांतून गाणी नकोत
मिरवणूक मार्गावर ६० ड्रोन व २०० सीसीटीव्हींद्वारे नजर
दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक
गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके, उपायुक्त, सहायक आयुक्तांसमवेत स्ट्रायकिंग फोर्स
निर्भया, दामिनी, गुन्हे शाखांचेही पथके मिरवणुकीत लक्ष ठेवतील

गणेश विसर्जन मिरवणूक (दि. १७, सकाळी ११ वाजता)
मार्ग : भद्रकाली येथील वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. तेथून महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरमार्गे संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून मिरवणूक गोदाकाठापर्यंत पोहोचेल.
सकाळी ११ वाजता गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीला सुरूवात होईल. लेझर आणि गुलालाचा वापर कोणीही करणार नाही. मंडळांना त्यासंदर्भात पोलिसांनी व महामंडळाने सूचना केल्या आहेत. लेझर लावणाऱ्यांवर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचेही लक्ष असेल.
समीर शेटे, अध्यक्ष, नाशिक गणेशोत्सव महामंडळ
प्रत्येक मंडळासोबत एक अधिकारी व काही अंमलदार असतील. मंडळांना वेळ व आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविणार आहोत.

गणेश विसर्जन मिरवणूक (दि. १७, सकाळी ११ वाजता)
मार्ग : भद्रकाली येथील वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. तेथून महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरमार्गे संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून मिरवणूक गोदाकाठापर्यंत पोहोचेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या