Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : चेनस्नॅचर्सवर आता 'मोक्का'; सहा दिवसांत ३२ गुन्ह्यांची उकल

Nashik Crime : चेनस्नॅचर्सवर आता ‘मोक्का’; सहा दिवसांत ३२ गुन्ह्यांची उकल

३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात सोनसाखळी (Chain Snatcher) ओरबाडून नेणाऱ्या सराईतांना वटणीवर आणण्यासाठी पहिल्यांदाच नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) आयुक्तालयाने या चेनस्नॅचर्सवर मोक्का कारवाईचे अस्त्र उपसले आहे. या कारवाईमुळे (Action) सराईतांना जरब बसून गंभीर गुन्ह्यांचा आलेख जवळपास कमीच होणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरातील जबरी चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने पथकांना आदेश दिल्यानंतर स्थानिकांच्या तीन टोळ्यांना गत पाच दिवसांत गुन्हे शाखा व पोलिस ठाण्यांच्या पथकांनी बेड्या ठोकून सहा संशयितांना ताब्यात घेत ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, सातत्याने वाढणाऱ्या सोनसाखळी चोऱ्या नियंत्रित करण्यासाठी संशयितांच्या टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे प्रस्तावअंतिम टप्प्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये, गुन्हे शाखा युनिट एक व दोनसह उपनगरपोलिसांनी सराईत सोनसाखळी चोरट्यांना अटक व काही विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनही पथकांनी अटक केलेले संशयित सराईत गुन्हेगार असून,त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. यासह शहरात इराणी टोळीनेही जबरी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा माग पथके काढत असून, जबरी चोरट्यांना प्रतिबंध करण्यासाठी आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील टोळ्यांवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या सखोल तपासासह भविष्यात या स्वरुपाच्या गुन्ह्यांचे (Crimes) प्रमाण घटण्याची दाट शक्यता आहे.

गांभीर्याने तपास!

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सराईतांसह अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आल्याने पोलिस पथके गांभीर्याने तपास करीत आहेत. काही गुन्ह्यां मध्ये जिल्ह्यासह बाहेरील सराफ व्यावसायिकांनी सोने खरेदी केल्याचाही पोलिसांना माहिती आहे. त्यामुळे ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाल्यावर सोनसाखळी ओरबाडणाऱ्यांपासून खरेदी व विक्री करणा-यांपर्यंत सर्व संशयितांची साखळी उलगडणार आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकांनी कारवाईला सुरुवात केल्याचे कळते.

संशयितांकडून जप्त मुद्देमाल व चैन स्नॅचिंगचे उघड गुन्हे

किरण उर्फ दाजी छगन सोनवणे (वय ३८, रा. पेठरोड), योगेश दत्तू गायकवाड (२८, रा. सिन्नर) व सोमनाथ उर्फ साई खलाटे (रा. बीड) – १८ लाख ११ हजार आठशे रुपये (२२ तोळे सोन्याची लगड, सत्तर हजारांची दुचाकी, ३० हजार पाचशे रुपयांची गावठी पिस्तुल) – २० गुन्ह्यांची उकल. सचिन केशव पाटील (वय २८ रा. आनंदवली), अनिल सुभाष चिंतामणी (२९, रा. वडाळा, श्रीरामपूर) ४ लाख ८१ हजार रुपये (५६.५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक दुचाकी) ४ गुन्ह्यांची उकल दोन अल्पवयीन मुले ७ लाख १८ हजार चारशे रुपये (७७.५५० ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन दुचाकी) – ८ गुन्ह्यांची उकल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...