Wednesday, October 30, 2024
HomeनाशिकNashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नाशिक | Nashik

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) महायुतीने (Mahayuti) शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) विद्यमान आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्याविरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भुजबळ-कांदे संघर्ष वाढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीत सुहास कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ व धमकी दिली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Thackeray vs Shinde Shivsena : राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांत होणार मशाल-धनुष्यबाण थेट सामना

त्यानंतर याप्रकरणी दोघांनी मंगळवारी रात्री आमदार कांदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता पोलिसांनी (Police) कांदे यांच्याविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) दाखल केले आहेत. दोन दिवसापूर्वी शेखर पगार यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या सभेत भाषण केले होते.त्यांचे भाषण संपताच आमदार कांदे यांनी त्यांना फोन करुन धमकी व शिवीगाळ केली.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला समोर; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा?

या फोनमधील (Phone) संवाद पगार यांच्या फोनवर रेकॅार्ड झाला. यानंतर पगार यांनी भरसभेतच तो सर्वांना ऐकवला. तर दुसऱ्या घटनेत समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना आमदार कांदे यांनी तहसील कार्यालयाबाहेर धमकी दिली. त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोन्ही प्रकरणात कारवाई करण्याची मागणी समीर भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे एबी फॉर्मही जोडले

दरम्यान, भुजबळ आणि कांदे (Bhujbal vs kande) यांच्यात आधीपासूनच संघर्ष आहे. मात्र, महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आल्याने दोन्ही नेत्यांमधील संघर्ष थांबला होता. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी नांदगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार आहे. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक हे उमेदवार आहेत. तर याच मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या