Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik Political : ॲड. राहुल ढिकले पुन्हा विधानसभेत जाणार - आढाव

Nashik Political : ॲड. राहुल ढिकले पुन्हा विधानसभेत जाणार – आढाव

पंचवटी | Panchvati

मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ.ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी अनेक विकासकामे केली आहेत. तसेच सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे मतदार ढिकले यांना पुन्हा विधानसभेत पाठवतील, असा विश्वास महायुतीचे (Mahayuti) समन्वयक तथा शिवसेनेचे नाशिक पूर्व विधानसभाप्रमुख बाबूराव (विनायक) आढाव यांनी व्यक्त केला. प्रचारासाठी नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) असंख्य मतदार उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

नाशिक पूर्व मतदारसंघात (Nashik East Constituency) मागील पाच वर्षांत भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले यांचा मतदारांसोबत उत्तम जनसंपर्क आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा भर असतो. पाच वर्षांत आमदार ढिकले यांनी सामान्य जनतेसोबत नाळ जोडली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक व जातीय सलोख्यात कधीही तेढ निर्माण होऊ दिली नाही. सर्वांना सोबत घेऊन फिरणारा आणि राहुल ढिकले म्हणजेच मी आमदार अशी त्यांनी प्रतिमा निर्माण केली. अतिशय साधे राहणीमान त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे आज मतदारसंघात सर्वत्र विकासकामे (Development Works) झालेली दिसत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

माजी नगरसेवक दिनकर आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. केवळ आश्वासन द्यायचे आणि वेळेत पूर्तता करायची नाही, असे काम आमदार ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात केले नाही. उलट आश्वासन देताना विचार करून आश्वासन दिले. आश्वासन दिले ते पूर्ण करून दाखवले. जनता जनार्दन पुन्हा आमदार ॲड. राहुल ढिकले यांना विधानसभेत नाशिक पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निश्चितपणे पाठवतील, असा विश्वास आढाव यांनी व्यक्त केला. उपस्थित मतदारांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना समर्थन दिले. महायुतीत शिवसेना, भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांची एकत्रित वज्रमूठ आहे. सर्व नेतेमंडळी संघटित असून आमदार ॲड. ढिकले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, असे बाबूराव आढाव म्हणाले. आमदार ढिकले यांना पुन्हा विजयी करून दाखवणारच, असा निर्धार महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला.

हे देखील वाचा : माझ्यावर आणि विकासकामांवर जनतेचे प्रेम : आ.सीमा हिरे

नाशिकरोड प्रभाग क्रमांक १७ मधील गणपती मंदिर, ओमनगर, शिल्प विहार, स्वामी समर्थनगर, पार्वताबाईनगर, कोयना सोसायटी, वीर सावरकरनगर, तिरुपतीनगर, रुक्मिणीनगर, हनुमंतनगर, अनमोल पार्क, पुष्पकनगर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, इंगळेनगर, ब्रह्मगिरी सोसायटी, कैलासजी सोसायटी, वृंदावन कॉलनी इत्यादींसह विविध ठिकाणी बैठका आणि प्रचार दौरा करण्यात आला. दौऱ्यात प्रभागाचे माजी नगरसेवक दिनकर आढाव, मंगेश मोरे, सचिन हांडगे, राजेश आढाव, कैलास मैंद, राहुल बेरड, आप्पा नाठे, संदीप पाटील, प्रवीण पवार, राहल कोथमिरे, सचिन सिसोदे, दिनेश नाचण, सचिन पवार, बबलू चंदननी, योगेश कपिले, सुरेखा निमसे, कुंदा सहाने, राहुल गायकवाड, शंतनू निसाळ, कृष्णा बोराडे, अमोल बोराडे, विजय भिशे, मतेश जडगुले, सागर लखन, योगेश रसाळ, कपिल खर्जुल, यतीश ठाकूर यांच्यासह आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या