पंचवटी | प्रतिनिधी
विधानसभेच्या नाशिक पूर्व मतदार संघामधून महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांनी आज प्रभाग दोनमधील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यामुळे गेल्या पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातून मतदार त्यांना पुन्हा संधी देणार आहे.
महायुतीचे उमेदवार ॲड. ढिकले गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने विकासकामांच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय ते नागरिकांची भेट घेत आहे. आज प्रभाग दोनमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, संतोष भोर, दिलीप निमसे, गणेश माळदे, रामभाऊ संधान, जालिंदर शिंदे, नामदेव शिंदे, अभय माळोदे, प्रभाकर मते, कैलास शिंदे, शुभम वाघ, तुषार डोमकावळे, साहिल पाटील, सार्थक पाटील, रमेश लभडे, प्रकाश लभडे, बाजीराव माळदे, मुन्ना कापडणीस, विशाल जाधव, कैलास महाले, सुभाष शिंदे, रवि धारबळे, विनोद ढिकले, शुभम ढिकले, नीलेश म्हस्के, जाफर सय्यद, मंगेश भडांगे, करण शिंदे, रमेश लभडे, बाजीराव साठे, अर्जुन लभडे, हर्षल शिंदे, प्रणव भुसारे, रविसूर्य मगर, आदित्य देशमुख, संदीप लभडे, मयूर मते, प्रशांत बुवा, राजू म्हस्के, जिगर बागवान, सद्दाम सय्यद, अर्जुन माळोदे आदीसह प्रभागातील विविध ठिकाणचे मतदार बंधू व भगिनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
भाजप शहर चिटणीस संतोष भोर म्हणाले की, सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ढिकले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. यंदा मात्र पक्षाने पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर केल्याने पक्षानेच त्यांना कामाची पावती दिली. आता ढिकले यांनी पाच वर्षात केलेल्या कामांची पावती मतदारांकडून मिळणार आहे.
गेल्या पाच वर्षातील जनसंपर्क, कामास कधीही नकार न देणारा, सांगितलेले काम पूर्णत्वास नेणारा आपला राहुल भाऊ अशी प्रतिमा जनमानसात निर्माण करणारे व बहिणीचे लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झालेले ॲड. ढिकले यांचा विजय तर निश्चित आहेतच, फक्त आता किती मताधिक्य मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप निमसे यांनी व्यक्त केली. आ. ढिकले हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचलित आहे.
मागील निवडणुकीमध्ये मिळालेल्या संधीचे ढिकले यांनी सोने केले. म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊन कामाची पावती दिली आहे. महायुती सरकारच्या कमी कालावधीमध्ये मोठी कामे झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आमदार ढिकले यांच्या प्रयत्नातून पन्नास कोटींचे दोन उड्डाणपूल होत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठी पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांनी केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा