Sunday, November 17, 2024
HomeनाशिकNashik Political : बच्चू कडूंच्या प्रचारसभेला अलोट जनसागर

Nashik Political : बच्चू कडूंच्या प्रचारसभेला अलोट जनसागर

विधानसभेत विकासाचे चौकार मारण्यासाठी गुरुदेव कांदेंना संधी द्या - बच्चू कडू

निफाड | प्रतिनिधी | Niphad

सत्तेत कोणाला बसवायचं हे बच्चू कडू (Bachchu Kadu) ठरवणार आहे. कारण सत्तेत बहुमताचे कोणाचे सरकार येणार नसल्याने सरकारचे भवितव्य कडू ठरवणार यासाठी निफाड तालुक्यातील सर्व जनतेने बच्चू कडूचा भिडू गुरुदेव कांदे (Gurudeo Kande) यांना संधी द्यावी, उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देत शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य मजुरांच्या व दिव्यांग बांधवांच्या प्रश्न मांडण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवावा, असे आवाहन पिंपळगाव येथील गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या प्रचार सभेत बच्चू कडू यांनी केले. तत्पूर्वी स्वराज्य पक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवराव गोसावी, चांदवड देवळा प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेचे उमेदवार गणेश निंबाळकर, प्रहार जनशकी पक्षाचे नाशिक उपजिल्हाध्यक्ष सागर निकाळे,रिपब्लिकन काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पगारे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या संध्याताई जाधव यांच्यासह आदी मान्यवरांचे या प्रचार सभेच्या (Campaign Meeting) निमित्ताने जोरदार भाषणे झाली.

- Advertisement -

७५ वर्ष आळीपाळीने सरकार बनवणान्या भाजप काँग्रेसला (Congress) सर्वसामान्य नागरिकांचे जनतेचे दुःख दिसलेच नाही. सामान्य कार्यकर्ता त्यामुळे आता पेटून उठला आहे. त्यामुळेच तुमच्यासारखा सर्वसामान्य असणारा बब्बू कडू वीस वर्षापासून निवडून येत आहे. सरकारच्या धोरणांमुळे दंगली वाढल्या, त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. साडेतीन लाख शेतकरी बांधव आपल्या शेतात मेले पण या सरकारला त्यांची दया आली नाही की शेतकन्यांच्या धोरणात बदल करावे, शेतकऱ्यांना व शेतमजुरांना सामाजिक न्यायिक प्रभावा आणि त्यांचे जीवनमान उंच व्हावे. म्हणून धर्मावर जातीवर उमेद‌ार कोणात्या धर्माचा कोणत्या जातीचा यावर त्याला तिकीट दिले जाते हे सर्व बंद करण्यासाठी आपली एकच जात शेतकरी शेतमजूर व या सर्वांसाठी आपल्याला ही लढाई लढत आहे. महाशक्तीच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात लढवत आहोत.

निफाड़करांनी (Niphad) साथ दिल्यास कांद्याचे भाव का पाडले जातात हे कोण पाडते यावर अंकुश निर्माण करण्यासाठी दिव्यांग बांधवांचा प्रश्न विधानसभेत सोडवण्यासाठी प्रयत्न केले. सत्ताधारी जो अपप्रचार करत आहे हिंदू खतरे में है मुस्लिम खतरे मे है पण खरं सांगतो तुम्हाला की फक्त शेतकरी खतरे में है बाकी सगळी राजकीय नौटंकी आहे. उमेदवार गुरुदेव कदि यांच्या आजच्या आलोट गर्दीवरुन सिद्ध होत आहे की निफाडकरानी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे.आणि तो येणान्या २० तारखेला मताच्या रूपातून मला दिसणार आहे व २३ तारखेला परिवर्तन निश्चित घडणार आहे. गुरुदेव कांद्यांचा गुलाल घेण्यासाठी मला निफाडला यावे लागणार आहे. हे आता मला जाणवले आहे आमचा कोणी नेता नाही, आमचा कोणी बाप नाही आमचा मायबाप एकच शेतकरी व मजूर त्यामुळेच आम्ही कोणाला घाबरत नाही आमच्या उमेदवाराला दमबाजी किंवा दादागिरी करण्याचा जो काही प्रकार कोणी करत असेल तो आम्ही खपवून घेणार नाही असे त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले.

विरोधकांनी आपल्या भाषणातून आवाहन दिले आम्ही जय पराजयाला घाबरत नाही परंतु जर कोणी आमच्या वाट्याला जाणार असेल तर साडेतीनशे गुन्हे अंगावर असणारा बच्चू कडूशी गाठ आहे. असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात प्रहार पक्षाचे तीन उमेदवार या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करीत आहे व हे तीनही उमेद‌वार मुंबई विधानसभेत प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून गेल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.तर गुरुदेव कांदे यांच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जनतेचे प्रश्न घेऊन कामे करण्यासाठी आतुर आहे. तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने, एमआयडीसीचा प्रत्र असो हे सोडवण्यासाठी हा मनुष्य रात्रंदिवस मला समजून सांगत आहे. त्यामुळे अशा काम करणाऱ्या माणसामागे आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे. व त्यांना निवडून दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी आपल्या प्रास्ताविकात तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांचा पाढा वाचला निसाका, रामाका, नांदूरमध्यमेश्वर धरण अभयारण्य पर्यटन स्थळाचा विकास, तालुक्यातील बेरोजगारांसाठी एमआयडीसी, शिवार रस्ते, तालुक्यातील असंघटित कामगारांचा मोठा प्रश्न,आदिवासी बांधवांचा प्रश्न त्यांना मिळणारे न्याय हक्क दोन्ही बाजार समिती यांना जोडणारे मार्ग, जिल्हा बँक असे अनेक प्रश्न उपस्थित करताना निसाकासाठी आपला मास्टर प्लॅन तयार असून कांदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पिंपळगाव, लासलगाब बाजार समितीत परप्रांतीय मजुरांना काम दिले जाते परंतु तालुक्यातील मजूर बांधवांना काम दिले जात नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या भाषणात केला. नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने माझ्या निफाड तालुक्यातील बळीराजाच्या जमिनीवर बोजा चढवण्याचे काम सुरू आहे.परंतु शेतकरी हा बुडवणारा नाही. पंरतु निसर्गाने व शासनाच्या धोरणांनी बळीराजा शेतकन्यांना देशोधडीला लावले आहे. द्वाक्ष सारख्या पिकावर प्रक्रिया उद्योग २५ वर्षापासून आमदारकी भोगणाऱ्या आजीबाजींनी आणण्याचे धाडस आणले नाही. फक्त मतासाठी राजकारण करणाऱ्या या सत्तापिपासू लोकांना जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे आहे. कुंदेवाडी उगाव शिवडी, लासलगाव येथील प्रलंबित उड्डाणपूल गत अनेक वर्षापासून हेलकावे खात आहे. परंतु आजी-माजी फक्त निवडणुकीत या गंभीर प्रश्नांवर भाषण ठोकतात निफाड उपजिल्हा रुग्णालय म्हणजे हे फक्त एक इमारत असून याकड आजी- माजीचे लक्ष नाही.निफाड तालुक्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा सामना होणार आहे. धमकवून जर कोणीही निवडणूक शिकण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यास हा गुरुदेव कांदें उत्तर देण्यास सक्षम आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुहास सुरळीकर यांनी केले. तर या सभेसाठी प्रहर जनशक्ती पक्षाचे प्रदेश जिल्हा तालुका शेतकरी संघटनेचे प्रदेश जिल्हा तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या