Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : जिल्ह्यात भाजपची मंत्रिपदाची पाटी कोरीच!

Nashik Political : जिल्ह्यात भाजपची मंत्रिपदाची पाटी कोरीच!

अपेक्षा फोल, नाराजीचा सूर; पुढील वेळी संधीची अपेक्षा

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devedra Fadanvis) यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मंत्रिमंडळाचा पहिला महाविस्तार रविवारी (दि.१५) रोजी नागपूर येथे झाला. यावेळी ३९ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या (Shivsena) एका नेत्याला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. मात्र, जिल्ह्यातील भाजपच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप (Bjp) कार्यकर्त्यांत काही प्रमाणात नाराजी दिसत आहे. तरीसुद्धा पुढील वेळी जिल्ह्यातून भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी नक्की मिळेल, असा आशावादी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अॅड.माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) व मालेगाव बाह्यचे शिवसेना आमदार दादा भुसे (Dada Bhuse) या नेत्यांना आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना आजच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांतही नाराजी उमटली आहे. नुकत्याच लेल्या विधानसभा निवडणूक महायुतीला मोठे यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १४ तर शहरातील चारही जागा महायुतीने जिंकले आहे. नाशिक मध्य, पूर्व व पश्चिम या ठिकाणी भाजपने तर देवळालीत राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. मध्य नाशिकमधून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.

नाशिक पश्चिममधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्यासह नाशिक पूर्वचे आमदार अॅड. राहुल ढिकले, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचीही नाव चर्चेत होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्ह्यातील मालेगाव बाह्यमधून निवडून येणारे ज्येष्ठ शिवसेना नेते दादा भुसे, येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले होते. त्यावेळीही भाजप कोट्यातून राशिकला मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही, याकेळीही भाजपची जिल्ह्यातील मंत्रिपदाची (Ministership) पार्टी कोरीच दिसत आहे. आगामी नाशिक मनपा निवडणूक व २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाचे नियोजन लक्षात घेता नाशिक शहरात भाजपचा एक तरी मंत्री असणे गरजेचे होते. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा होती.

राज्यात महायुतीचे सरकार निवडून आले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारविनिमय करून मंत्रिमंडळाचा विस्तार केला असेल. भाजपला मंत्रिपद मिळावे, अशी आम ची भावना आहे. मात्र, योग्य नियोजन व विचार करूनच निर्णय घेण्यात आला असेल. भविष्यात आम्हाला संधी मिळेल, अशी आशा आहे.

लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते, भाजप

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...