Sunday, November 17, 2024
HomeUncategorizedNashik Political : पंचवटीत दुमदुमला गणेश गिते यांच्या विकासकामांचा जयघोष

Nashik Political : पंचवटीत दुमदुमला गणेश गिते यांच्या विकासकामांचा जयघोष

रामकृष्ण हरी, आता वाजेल तुतारी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी… आता आवाज घुमणार तुतारीचा, पाहिजे गणेश भाऊ गिते आमदार… आपले मत नाशिकच्या विकासासाठी… अशा जयघोषात पंचवटीचा परिसर दुमदुमला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते (Ganesh Gite) यांच्या विजयाच्या निश्चितीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

पेठरोडवर (Peth Road) वाहतुकीची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे नेहमी खराब रस्त्यामुळे पेठरोडवरील नागरिक त्रस्त होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या ठिकाणी कॉंक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. गणेश गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात पेठरोडच्या कॉक्रिटीकरणाचा निर्णय घेत, त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात पंचवटीमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. यावेळी अनेक ठिकाणी माता- भगिनींकडून त्यांचे औक्षण केले गेले.

ज्येष्ठांकडून त्यांना विजयाचे आशीर्वाद भेटले, विविध सामाजिक संस्था गीते यांना पाठिंबा दिला आहे. तर रिपब्लिक पार्टी (धर्मनिरपेक्ष) यांनी देखील पाठिंबा दिला आहे. पंचवटीमध्ये विविध विकासकामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासपुरुष अशी आधी असलेल्या गणेश गिते यांना निवडून देण्यासाठी पंचवटीकरांनी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे.पंचवटी या भागामध्ये आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचवटी भागामध्ये विकासकामे होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी गणेश गिते यांचा कामाचा अवाका आणि अनुभव खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पंचवटीमध्ये विविध कामे होण्यासाठी ते सर्व प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या विधानसभेमध्ये त्यांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) विविध पदाधिकारी कार्यक्र्ते हे सर्वत्र त्यांचा प्रचार करत आहे.

याठिकाणी झाला दौरा

यादौयात इंद्रकुंड, दिंडोरी नाका परिसर, श्रीराम नगर, लोक सहकार नगर, चित्रकूट, महाराष्ट्र को. ऑप. सोसायटी, कालिका नगर, तीन मंदिर परिसर, गोंडवाडी, राहुलवाडी, फुलेनगर, तीन पुतळे, म्हसोबा नगर, हरि ओम नगर, पाटावरून, बजेश्वरी नगर, तारवाला नगर परिसर, लामखेडे मळा परिसर या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कष्ठीसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई यांच्यासह अनेक महा‌विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या