Monday, November 18, 2024
HomeराजकीयNashik Political : जिल्हानिर्मितीसह वैद्यकिय-इंजिनिअरींग कॉलेज सुरू करू

Nashik Political : जिल्हानिर्मितीसह वैद्यकिय-इंजिनिअरींग कॉलेज सुरू करू

दादा भुसे यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

अवघ्या अडीच वर्षात विकासाचे विविध प्रकल्प सुरू करत लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या, यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आणण्याचा निर्धार लाडक्या बहिणींसह भाऊ, शेतकरी, कामगार, निराधार व जनतेने केला आहे. सोपविलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सदैव सार्थ ठरविणाऱ्या व शिक्सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कधीही प्रतारणान करणाऱ्या दादा भुसेंना मताधिक्य देत तुम्ही विजयी करा, असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव जिल्हा निर्मिती (Malegaon District Formation) करण्याबरोबरच वैद्यकिय व इंजिनिअरींग महाविद्यालय सुरू करत औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग सुरू करू व मंजूर केलेला नार-पार प्रकल्प तातडीने पुर्ण करण्याची ग्वाही येथे बोलतांना दिली.

- Advertisement -

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील (Malegaon Outer Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या प्रचारार्थ आज कॉलेज मैदानावर आयोजित सभेत मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. या सभेस शहरासह तालुक्यातील हजारोच्या संख्येने महिला, युवक व नागरीक उपस्थित असल्याने कॉलेज मैदान अक्षरशः गर्दर्दीने फुलले होते. दादा भुसे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, धनुष्यबाण व मतदारांशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच तुम्ही चार वेळा त्यांना मताधिक्य देत निवडून दिले आहे.

आज सभेला उपस्थित हजारो लाडक्या बहिणी, भाऊ यांच्यासह विराट जनसमुदाय त्यांच्या विजयाची साक्ष देतअसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, तुम्ही भुसेंना मताधिक्य देत विजयी करा मी मालेगाव जिल्हा निर्मितीसह येथे वैद्यकिय व इंजिनिअरींग महाविद्यालय (College of Engineering) सुरू करतो. शेती महामंडळाच्या जागेवर मोठे उद्योग यावेत यासाठी उद्योगमंत्र्यांना आचारसंहिता संपताच बैठक घेण्याची सुचना करेल याबरोबरच मंजुर केलेला नार-पार प्रकल्प तातडीने पुर्ण करण्यासह जिल्हा बँकेतील १८ लाख ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यात येत असलेली अडचण देखील आपण दुर करू, असे वचन देतो. शिंदे जेव्हा वचन देतो ते पूर्ण करतो. यासाठी तो कुणाचेच काय स्वतःचे देखील ऐकत नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यानी देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.

मालेगावात भगव्याचेच राज्य राहणार आहे हे स्पष्ट झाले आहे. दुसरा उमेदवार हिरेंच्या पोटी गारगोटी जन्मला असल्याची टिका करत मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले निशाणी चोरल्याचे काही जण सांगू लागले आहे. परंतू त्यांची निशाणी असलेली मशाल क्रांतीची नाही तर घराला आग लावणारी जाती-जातीत तेढ निर्माण करणारी मशाल आहे. भुसेंचा भुसा पाडणार अशी बल्गना त्यांनी केली परंतू दोन वर्षापुर्वी तुमचा भुसा मी पाडला व विकास थांबवणारी महाविकास आघाडी खड्यात टाकली अशी टिका मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.लाडकी बहिण योजना खोटी व फसवी असल्याचे सांगत योजनेला बदनाम केले. तोंडात सोन्याचा चमचा व पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना लाडक्या बहिणीचे दुःख कसे कळणार? त्यामुळे यांचा विरोध झुगारत योजना सुरू केली व यशस्वीपणे राबविली सुध्दा त्यामुळे लाडक्या बहिण, भाऊ, शेतकऱ्यांनीच यांच्या सत्तेचा रस्ता बंद करून टाकला असल्याची टिका शिंदे यांनी पुढे बोलतांना केली.

यावेळी मार्गदर्शन करतांना दादा भुसे यांनी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आपण राबविलेल्या योजना व केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. परंतू विरोधकांनी विकासावर बोलण्याऐवजी आपल्यावर खालच्या पातळीवर टिका केली. बेरोजगारांना नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. म. गांधी विद्यामंदिर व आदिवासी शिक्षण समितीत भयमुक्त वातावरण करावे लागणार आहे. मार्केटची जागा बीओटी तत्वावर खाण्याचा डाव असला तरी येत्या दोन महिन्यात समितीचा टांगा पलटी करू. जनतेने अफवांना साथ न देता महायुतीला मतदान करावे. दोघा उमेदवारांची नुरा कुस्ती आहे मते खाण्यासाठी एक-दुसऱ्याला रसद पुरवत असल्याची टिका केली.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर अजय बोरस्ते, मधुकरबापू हिरे, पल्लवी सावे, नितीन पोफळे, सुरेशनाना निकम, सखाराम घोडके, देवा पाटील, अॅड. संजय दुसाने, मनोहर बच्छाव, निलेश कचवे, विनोद वाघ, निलेश आहे, राजेश अलीझाड, भारत जगताप, संगीता चव्हाण, सुनिल देवरे, भिका कोतकर, प्रमोद पाटील, किशोर इंगळे, धर्मा भामरे, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, भिकन शेळके, डॉ. एस. के. पाटील, भारत चव्हाण, राजेंद्र जाधव, मधुकरमाऊली वडगावकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या