Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : पालिका, नगरपंचायती सक्षम करणार - जिल्हाधिकारी

Nashik Political : पालिका, नगरपंचायती सक्षम करणार – जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील (District) ९ नगरपरिषद व ८ नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी (Collector) नियोजन करीत आहेत. नगरपरिषदांना पूर्णवेळ अधिकारी, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनावर सर्वाधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) नऊ नगर परिषदा आणि आठ नगरपंचायती आहेत. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (Population) सुमारे ७० ते ७५ लाख गृहित धरली तरी १५ ते २० लाख नागरिक हे नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात राहतात. याठिकाणी त्यांना मूलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने राहण्यासाठी महापालिका क्षेत्राकडे त्यांचा ओढा वाढत असतो; किंबहुना जास्तीत जास्त नागरिक हे शहराकडे स्थलांतरीत होत आहेत. परिणामी शहराच्या सेवा सुविधांवर ताण वाढत राहतो. आणि नगरपालिका नगरपंचायतींचा विकास मागे पडताना दिसून येतो.

नाशिक शहरालगत (Nashik City) त्र्यंबकेश्वर, ओझर, पिंपळगाव बसवंत, भगूर, सिन्नर या सहा नगरपरिषद व नगरपंचायती आहेत. त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी पाणीपुरवठा, व्यवस्थापन व नियमितपणे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा सुरळीत केल्यास नागरिकांचे स्थलांतर थांबवणे सहज श्रेय होणार आहे. या सर्व गोष्टींची अमंलबजावणी करण्यासाठी त्या त्या ठिकाणी पुर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे राज्य शासनाकडे करणार आहेत. तसेच नगरविकास विभागाकडून जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहेत. या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमितपणे सुरु कशी राहिल, यावर भर देण्याचे नियोजन आहे.

५०० कोटींचा आराखडा

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आत्तापासून सुरु झाले आहे. त्या दृष्टिकोनातून त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने ५०० कोटींचा सिंहस्थ आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनावर भरीव काम करण्यात येणार आहे. विशेषतः दुर्गंधीयुक्त पाणी प्रक्रिया करुन शुद्ध कसे होईल, याचा प्रामुख्याने विचार होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नगर परिषदेची स्थापना

लोकसंख्येचा आकडा २५ हजारांवर पोहोचल्यानंतर त्या शहरात नगर परिषदेची स्थापना केली जाते. लोकसंख्यानिहाय चार गटात त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. एक लाखापेक्षा वरील लोकसंख्या असल्यास ‘अ’ वर्गात तिचा समावेश होतो. तर ७५ हजार ते एक लाख लोकसंख्या असलेली नगर परिषद ‘ब’ वर्गात, ५० ते ७५ हजार लोकसंख्या असलेली नगर परिषद ‘क’ वर्गात समाविष्ट केली जाते. सर्वात शेवटी ‘ड’ वर्ग नगर परिषदेत २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असते.

नगर परिषद (९) : मनमाड, येवला, नांदगाव, भगूर, बागलाण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, पिंपळगाव बसवंत

नगरपंचायती (८) : दिंडोरी, सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड, पेठ, देवळा, ओझर

नगर परिषद व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्राकडे आजवर काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात भविष्यातील विस्तार हा त्याच भागात होणार असल्याने त्या भागांना सक्षम करण्याच्या दृष्टीने व त्या भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना त्या भागातच थांबविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. यादृष्टीने जिल्हाभरातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींचा प्रामुख्याने विचार करुन तेथील मूलभूत सुविधा वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस आहे.

जलज शर्मा, जिल्हाधिकारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...