दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
बिरोधक जातीपातीचे राजकारण करून मतदारसंघात एक नवीन पायंडा पाडण्याचे काम करीत आहे. कै. हरिभाऊ महाले, कै. कचरु राऊत, कै. सीताराम भोये व नरहरी झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधींचे काम करतांना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. जो येईल त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या कथी कुणाची जात नाही विचारली. त्यामुळे आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. तसेच बिरोधक जनतेला अमिष दाखवतील, वेगवेगळ्या भूलथापा देतील आमिषे दाखवतील, परंतू याला बळी न पड़ता आपण सर्वानी एकमताने महायुतीचे उमेद्वार ना. नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मतांनी मताधिक्यांनी निवडून आणायचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी केले.
महाबुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा पेठ तालुक्यात (Peth Taluka) प्रचार दौरा महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी धनराज महाले बोलत होते. यावेळी कळमबारी, विरमाळ, चौकडा गांडोळे, घोटपाडा, दाभाडी, पिंपळपाडा, माळेगाव, म्हसगण, आमडोंगरा, आसदनपाडा, वखारपाडा, माळेगाव, जोगमोडी, घाटाळबारी, हरणगाव, फणसपाडा, कोपुर्ती बु., खीरकडे, मोहपाडा, हातरुंडी, घोडाळमाळ, जाधवपाडा, जळे, शिरोळे, बाडगी, पळशी, चिखली, घोळसपाडा आदी गावात प्रचार दौरा झाला. या गावातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रत्येक गावात ना. नरहरी झिरवाळ यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून ‘झिरवाळ साहेब ‘आगे बेढो हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा देत होते. यावेळी ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी ना. झिरवाळांचे औक्षण करून साहेब, आमचा पाठिंबा तुम्हालाच असल्याचे आदिवासी महिला वर्गानी सांगितले.
माजी आमदार धनराज महाले पुढे म्हणाले की, पेठ म्हणजे अतिदुर्गम तालुका आहे. हा तालुका १५ वर्षापूर्वी दिंडोरी मतदारसंघाला (Dindori Vidhansabha) जोडला पूर्वी आपल्या पेठची काय अवस्था होती हे मी सांगण्याची गरज नाहीं. कारण माझ अन ना. नरहरी झिरवाळ यांच सारं नातं पेठमध्ये आहे माझ अन झिरवाळ साहेबांचं बालपण या पेठ तालुक्यात गेल. मी आणि झिरवाळ साहेबांनी गेल्या वीस वर्षात काय केलं तुम्हाला माहित आहे आता काही येतील तुम्हाला चोलतील आमची बदनामी करतील त्यांचेवर विश्वास ठेवू नका, पेठ तालुक्याला जी विकासाची वाट मी आणि झिरवाळ यांनी दाखवली आहे तिला साथ द्या. भावनेच्या भरात वेगळा काही निर्णय घ्याल तर पुन्हा जुने दिवस येतील. २० ते २५ वर्षापासून नरहरी झिरचाळ राजकारणात काम करतात. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, आमदार तसेच विधानसभा परिषद अध्यक्ष पदापर्यंत काम केल्याने त्यांना चांगला अनुभव आहे. प्रत्येक माणसांचे काय काम आहे, प्रत्येक समाजाच्या काय अडचणी आहेत त्यांना माहिती आहे.
तसेच प्रत्येक गावातील माणूस आणि माणूस तोडीपाठ झाला आहे. त्यामुळे अशा माणसाला थांबवून नवीन आमदार पाठवून विधानसभेचे दरवाजे बघता बघता व माहिती मिळविण्यातच ५ वर्ष निघुन जातील. त्यामुळे आपल्याला विधानसभेचे कामकाज माहिती असणान्या झिरवाळ यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आपल्या दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाचा अजून सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण घड्याळ चिन्हावर बंटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार धनराज महाले यांनी केले आहे. समाजावर अतिक्रमण होत होते, परंतू ना. झिरवाळांनी अटीतटीचा सामना करून समाजात होणाऱ्या अतिक्रमण थांबवले. त्यामुळे ना. झिरवाळांवर विरोधकांनी काय काय आरोप केले हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनताही विरोधकांच्या भुलथापाना बळी पडणार नाही.
दिंडोरी पेठ तालुक्यात (Dindori-Peth Taluka) अनेक धरणे आहे. या धरणात गाळ साचल्याने पाणीसाठा कमी होतो. या धरणातील गाळ काढण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे. हे विषय मार्गी लावायचे असेल तर ना. नरहरी झिरवाळ यांना विधानसभेत आपल्याला पाठवावे लागेल. तसेच शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या अनेक तक्रारी व अडचणी येत असल्याने तोही मार्ग आपल्याला मोकळा करायंचा आहे. त्यासाठी फक्त झिरवाळ प्रयत्न करत आहे. त्यामुळे विधानसभेतील दिंडोरी पेठ मतदार संघाच्या अडीअडचणी नवीन उमेद्वार सोडू शकणार नाही. त्यामुळे ना. झिरवाळ यांनाच आपल्याला विधानसभेत बहुमताने निवडून आणून पाठवावे लागणार असल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ना. झिरवाळ यांनी दिंडोरी पेठ मतदार संघात केलेल्या विकासकामांचा आढावा सांगताच उपस्थितांनी आभार मानत पुन्हा एकदा नरहरी झिरवाळसाहेबांच्या खंबीरपणे पाठीशी राहून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणारच असा निर्धार व्यक्त केला.याप्रसंगी ना. नरहरी झिरवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवती, युवक, वयोवृध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झिरवाळच विकास करणार – मवाळकर
पेठ तालुक्यातील जनतेने आता ना. नरहरी झिरवाळ यांना साथ देण्याची वेळ आली असून दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाची पूर्णपणे ओळख ना. झिरवाळांनाच आहे. त्यांच्या कामाची पध्दत ही विकासाला धरूनच आहे. ‘मतदारांनी जागे व्हा आणि विकासालाच मत द्या’, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नामदेव मवाळकर यानी केले. पेठ तालुक्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर असून या प्रश्नावर ना. नरहरी झिरवाळ यांनी अभ्यास करून पाणी प्रश्न मार्गी लावला आहे व पाणीप्रश्न ज्या ठिकाणी प्रलंबित आहे तेथे तो मार्गी लागणार असून त्यांचा अभ्यास पेठ तालुक्यामध्ये पाणीप्रश्र गंभीर होता पण झिरवाळ यांच्यामुळे तो मार्गी लागत असून पुढेही ज्या ठिकाणी पाणी प्रश्न उद्भवत असेल तेथे झिरवाळ हे नक्कीच हे प्रश्न मार्गी लावतील. त्यामुळे पेठ वासीयांनी विकास कामांच्या दृष्टीने झिरवाळ यांना विधानसभेत्त संसदेत मंत्रालयात पाठवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपले मत घड्याळ विकासाला द्यावे, पेठ तालुक्यातील आरोग्य, विज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आपल्याला ना. झिरवाळ यांनाच विधानसभेत पुन्हा एकदा पाठवावे लागणार आहे. जर नवीन उमेदवार विधानसभेत गेला तर आपल्याला पाच वर्ष भोगावे लागणार आहे. पेठ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न ना. झित्वाळांनी सुदम नियोजन केले आहे. विधानसभेतील जी लढाई आहे ती लढाई झिरवाळसाहेब लढतील, ही वेळ जनतेने घालावली तर पाच वर्ष जनता आपली खुप मोठी नुकसान करतील. त्यामुळे आताच चिचार करुन झिरवाळांच्या पाठीमागे रहावे लागणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नामदेव मचाळकर यांनी केले आहे.
पुन्हा एकदा विधानसभेत झिरवाळांना पाठवणार – वाघमारे
स्वातंत्र्यानंतर आमच्या गावात विकास झाला आहे. आमच्या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर गावात स्मशानभूमी ही कमतरता होती. मात्र, त्या प्रश्नांबर ना. नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी केली असता ती मागणी पूर्ण झाली आहे. त्या पाठोपाठ गावात अंगणवाडी रस्ते यांची मोठे कमतरता भासत होती मात्र ना. झिरवाळ यांच्या पाठिंब्यामुळे व साथीने या गावात त्याचीही पूर्णता विकास कामे झाली आहे. महिला वर्गामध्ये आनंदाचे बातावरण असून झिरवाळ यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आमदार म्हणून झीरवाळ साहेबांच हवे असून त्यांना आमच्या गावाचा पूर्ण पाठिंबा मिळाला असून आम्ही गावकऱ्यांनी विकासाला साथ देण्याचे ठरविले असून आता विधानसभेत ना. नरहरी झिरवाळ साहेबच जाणार असा विश्वास करंजखेडचे सरपंच कमलेश वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा