नाशिक | Nashik
समान नाव आणि पिपाणी यासारखे एकाच नावाच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नांदगाव मतदारसंघात ( Nandgaon Constituency) मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची खेळी खेळली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या (Candidate) नावाशी साधर्म्य असणाऱ्या तीन जणांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मात्र, नाशिक मध्य मध्ये केला जाणारा असाच प्रयत्न कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे टाळला गेला.
हे देखील वाचा : Political Special : छोट्या पक्षांची मोठी गोची; ‘ना घर का ना घाटका’ अशी अवस्था
दिंडोरी लोकसभा निवडणुकीत (Dindori Loksabha Election) तिसरी उत्तीर्ण अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) यांच्यामुळे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचेमताधिक्य एक लाखाने घटले होते. नामसाधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाच्या राज्यातील अन्य उमेदवारांना कमी अधिक प्रमाणात झळ बसली होती. विधानसभा निवडणुकीत हाच प्रयोग काही जागांवर होत आहे. नांदगावमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) आ. सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा (अजित पवार) राजीनामा देत शड्डू ठोकणारे समीर भुजबळ आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) गणेश धात्रक यांच्यात ही लढत होत आहे. या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील सुहास कांदे आणि दिंडोरी तालुक्यातील गणेश धात्रक या नावाच्या अन्य दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार गणेश गिते आणि महायुतीचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्यात सामना होत आहे. या मतदारसंघात इगतपुरी तालुक्यातील गणेश बबन गिते नामक उमेदवारानेही अपक्ष उमेदवारी केली आहे. तर नाशिक मध्य मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत गिते यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या एका इच्छुकाने अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. पण उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गिते नामक व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करु न देण्यात काही जण यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा