नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
‘माझ्या नावाचा यापुढे कुठल्याही प्रकारे वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा नुकत्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात (Shivsena UBT) प्रवेश केलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आपली कन्या तनुजा घोलप यांना दिला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज
तनुजा घोलप (Tanuja Gholap) या बबनराव घोलप यांच्या कन्या असून त्यांचे पतीकडील नाव भोईर असे आहे. परंतु, गेल्या काही दिवसापासून तनुजा भोईर या तनुजा बबनराव घोलप असा उल्लेख करत आहे. त्यामुळे यापुढे तनुजा यांनी आपल्या नावाचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर (Action) कारवाई करण्यात येईल, असा इशारा बबनराव घोलप यांनी आपल्या वकिलामार्फत एका नोटीसीद्वारे दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा : बारामतीतून युगेंद्र पवारांनी भरला उमेदवारी अर्ज; शरद पवार म्हणाले…
दरम्यान, बबनराव घोलप यांनी नुकताच शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तनुजा घोलप या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असून त्या सुद्धा देवळाली मतदारसंघातून (Deolali Constituency) निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. या संदर्भात तनुजा घोलप यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागत आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : माजी मंत्री बबनराव घोलप यांची घरवापसी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
तनुजा घोलप ही आपली मुलगी जरी असली तरी तिने तिच्या पतीच्या नावाचा उल्लेख करावा. आपल्या नावाचा यापुढे कोणत्याही प्रकारे उल्लेख करू नये,अन्यथा आपण कायदेशीर कारवाई करू.
बबनराव घोलप, माजी मंत्री
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा