Thursday, May 15, 2025
HomeनाशिकNashik Political : नाशिक पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश गितेंना विधानसभेत पाठवणार

Nashik Political : नाशिक पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश गितेंना विधानसभेत पाठवणार

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

पंचवटीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी येऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहे. पंचवटीच्या विकासासाठी, सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी गणेश गिते यांनी संधी देणार असल्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते (Ganesh Gite) यांनी पंचवटीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पंचवटीतील दत्तनगर येथून प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या (Congress) धुळे येथील खासदार शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिकमध्ये कुंभमेळा (Kumbhamela) अवघ्या काही महिन्यांवर आलेला आहे. साधू-महंत ब भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्या संदर्भात पंचवटीमध्ये (Panchvati) विविध विकासकामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासपुरुष अशी उपाधी असलेल्या गणेश गिते यांना निवडून देण्यासाठी पंचवटीकरांनी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे.या विधानसभेमध्ये गीते यांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वत्र त्यांचा प्रचार करत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. पंचवटीचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील असे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सांगत आहे.

याठिकाणी झाला दौरा

दौऱ्यात दत्त नगर, शिंदे नगर, कुमावत नगर, जाणता राजा कॉलनी, सुदर्शन कॉलनी, शनी मंदिर, नवनाथ नगर, रोहिणी नगर, नवरंग परिसर, इंद्रकुंड, दिंडोरी नाका, मार्केट यार्ड, श्रीराम नगर, लोक सहकार नगर, चित्रकूट सोसायटी, मायको हॉस्पिटल, कालिका नगर, तेलंगवाडी, तीन मंदिर व मधला परिसर, रॅन्बो व्यायामशाळा, फुले नगर, पाटावरचा परिसर, वजेोवरी नगर, तारवाला नगर परिसर, लामखेडे मळा परिसर, तुळजा भवानी नगर, हरिओम नगर परिसर, समर्थ नगर परिसर, अवधूत कॉलनी (मंडलिक मळा) या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...