Thursday, October 31, 2024
HomeनाशिकNashik Political : गुरुदेव कांदेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद

Nashik Political : गुरुदेव कांदेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद

निफाड | प्रतिनिधी | Niphad

निफाड पंचायत समिती (Niphad Panchayat Samiti) व पिंपळगाव कृषि उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपला विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे (Gurudev Kande) यांना निफाड तालुक्यातील मतदार राजाच्या रूपाने वाढता मिळत असल्याने त्यांच्या समर्थकांचे हौसले त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून वाढले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख

दोघात तिसरा सक्षम पर्याय म्हणून निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) जनता गुरुदेव कांदेंच्या रूपाने बघत असल्याने आजी-माजी आमदारांच्या अनेक वर्षांच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला गुरुदेव कांदे आपल्या साध्या स्वभावाने मतदार राजाला आपल्याकडे आकृष्ट केले आहे. लोकशाहीच्या या पवित्रदिनी मतदारराजा मतदानाच्या दिवशी त्यांची बॅटिंग जोरदार करत बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. नागरिक व मतदार त्यांना बोलून दाखवत असल्याने गोदाकाट परिसरासह उत्तर पूर्व पट्ट्यातील नागरिक बोलून दाखवत आहे. या प्रचार दौऱ्यात पिंपळस रामाचे येथील तरुणांचा वाढता पाठिंबा तर सर्वसामान्य नागरिक स्वतःहून कांदे यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी होत आर्थिक, मानसिक, व शारीरिक मदत गुरुदेव कांदेंना करत असल्यामुळे दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नांदूर खुर्द सहकारी सोसायटीचे माजी सभापती हरिभाऊ कुशारे यांनी या दौऱ्या प्रसंगी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, जनतेच्या (Public) अडीअडचणी समजावून घेत निवडून आल्यानंतर फक्त कामांचा झपाटा लावून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांचा जनसेवक म्हणून मी आपले पाच वर्ष काम करेल ही भावनिक साद गुरुदेव कांदे घालत असल्यामुळे जनतेमध्ये त्यांची क्रेझ वाढत चालली आहे तर त्यांच्या या वाढत्या पाठिंबामुळे आजी-माजी समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे आजी-माजी याबाबत काय भूमिका घेतात याकडे निफाड तालुक्यातील जनतेचे व मतदार राजाचे लक्ष लागले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या