पंचवटी | Panchvati
काही लोक राजकारणाचा अनुभव नसतानाही अती महत्त्वाकांक्षा दाखवीत आहेत. चार पाच वर्षे राजकारणात होत नाहीत तोच पक्ष आपल्या मालकीचा समजून थेट आमदारकीचे स्वप्न बघतात, अशी टीका महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांचे नाव न घेता केली. स्थायी समिती ताब्यात असताना पालिका पोखरून खाल्याचा पुरावा उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञा पत्रातून उघड झाल्याचे नमूद करून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का, असा सवालही ढिकले यांनी उपस्थित मतदारांना केला.
हे देखील वाचा : Nashik Political : ‘ड्रग्जमुक्त नाशिक’ लढ्याच्या भितीने आ. फरांदेंविषयी तयार केला जातोय फेक नॅरेटिव्ह
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी दाखविलेला त्याग हा आदर्श असल्याचे सांगत गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीतील लढाईला नकळतपणे उजाळा दिला. सत्तेत आलो तर द्वारका ते दत्तमंदिर दरम्यानचा भारतमाला योजने अंतर्गत मंजूर उड्डाणपूल मार्गी लावण्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देऊ, रखडलेले नाट्यगृह पूर्णत्वास नेवू असे आश्वासन यावेळी ढिकले यांनी दिले. महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व मतदार संघाचे महायुतीचे नाशिक पूर्व मतदार संघाचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड (Nashik Road) येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी बिटको चौक येथे शकुंतला करवा यांच्या हस्ते झाले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”
दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमास माजी बाळासाहेब सानप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, रा. काँ. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत,सूर्यकांत लवटे, संगिता गायकवाड, निवृत्ती अरींगळे, अशोक तापडिया, मनोहर कोरडे, बाबुराव आढाव, रमेश धोंगडे, संजय भालेराव, विशाल संगमनेरे, शरद मोरे, सचिन हांडगे, गणेश उन्हवणे, शशिकांत उन्हवणे, रामबाबा पठारे, मंगेश मोरे, गणेश कदम यांच्यासह आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा