नाशिक | Nashik
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) गेल्या पाच वर्षात विकासपर्व प्रत्यक्षात आणले. ‘माझं नाशिक, माझी जबाबदारी’ हे ब्रीद त्यांनी कसोशीने पाळले. त्यांनी दोन पंचवार्षिक आमदार म्हणून केलेल्या कार्यामुळे मतदारसंघातील बहुसंख्य नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या विकासपर्वाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. विविध समाजघटकांनी त्यांना पाठिंब्याची पत्रे पाठवली आहेत. श्री संत सावतामाळी समाजमंदिराचे अध्यक्ष गोविंद विधाते, उपाध्यक्ष शंकर कमोद, सेक्रेटरी नितीन कानडे, खजिनदार शशीकांत जुन्नरे व सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रा. देवयानी फराद यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ – जाधव
आमदार निधीतून फरांदे यांनी समाजमंदिरासाठी दोन कोटी १८ लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून समाजमंदिर बांधून देण्याची हमी मिळाली कार्यसम्राट आमदार’ ही पदवी आम्ही समाजातर्फे बहाल केली आहे. आमचा समाज बांधव तुमच्या पाठीशी सर्वशक्तिनिशी आहे, असे पत्रात म्हटले आहे. समस्त चर्मकार समाजातर्फे उमेदवार प्रा. देवयानी फरादे यांना पत्रकाद्वारे पाठिंबा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. अध्यक्ष गणेश कानडे, उपाध्यक्ष अतिश काथवदे, सेक्रेटरी गौरव झावरे, खजिनदार श्रीकांत भोई, चिटणीस अक्षय काथवटे यांनी लिहिलेल्या पत्रात देवयानी फरादे यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत.
हे देखील वाचा : Shivsena (UBT) Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकरी ते मोफत शिक्षणासह केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
अखिल भारतीय मातंग संघातर्फे जिल्हाध्यक्ष गमाजी घोडे यांनी आमदार फरादे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रावर ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी विठ्ठल कांबळे, नारायण कांबळे, किशोर शिरसाठ, आत्माराम लगड, संदीप पालखे, शिवाजी अवचार, संतोष घोडे, गजानन रणबावळे, विलास साळवे, शिवाजी घोडे, गुलाब कांबळे, लहुजी साळवे, जनार्दन पारवे, भगवान घोडे, सुरेंद्र कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. समस्त भोई समाज पंच ट्रस्टने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात फरांदे यांनी समाजमंदिरासाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. एक कोटी ७५ लाख रुपये निधीतून समाजमंदिर, जंगलीदास महाराज मठ धर्मशाळा तसेच युवकांसाठी तालीम बांधकाम मार्गी लावले आहे. प्रा. फरादे यांना कायमच पाठिंबा असून या निवडणुकीत सर्व समाज पूर्णशक्तीनिशी पाठिशी आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : बागलाण, मालेगाव बाह्य, इगतपुरीत लागणार दोन मतदान यंत्रे
अध्यक्ष डॉ. सोमनाथ भोकरे, उपाध्यक्ष नीलेश वारे, सरचिटणीस गणेश सपकाळ,खजिनदार महेंद्र काथवटे, सदस्य सुरेश अहिरे,नंदकुमार सासे, पद्मिनीताई वारे, गणेश कांबळे, संदीप डहाके, संदीप सासे, पिंटू ठाकरे, निखिल सासे, गौरव सासे, देवानंद ठाकरे, भरतभाऊ डांगरे, विशाल ठाकरे, अमोल गुणवंत, सुनील चौधरी यांच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. स्वकुळ साळी पंच मंडळ, श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था आणि श्री महालक्ष्मी जिव्हेश्वर महिला मंडळ नाशिक यांनी आपला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. प्रा. फरांदे यांनी दोन कोटी रुपये निधी देऊन समाजाच्या गणपती मंदिराचे नूतनीकरण केले. याबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर सुनील साळी, मोहन गायकवाड, अमोल मानकर, विजय राऊत, मनीष शेकटकर, सचिन कांबळे, पवन साळी, आकाश क्माले, गणेश वाझट, प्रकाश तांबे, देविदास घावटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रमाणे मोठ्या संख्येने विविध समाज बांधव पाठिंबा जाहीर करीत असून प्रचारात सक्रिय सहभागी होत आहेत. त्यामध्ये स्त्री पुरुष तसेच नवमतदार युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे देखील वाचा : झिरवाळांमुळे जांबुटकेत जमिनीला सोन्याचे भाव : अपसुंद
अखिल भारतीय वनमाळी समाजाने आमदार फरांदे यांना धन्यवाद देत पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात पत्र पाठवून त्यात आमदार फरांदे यांनी वेळोवेळी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जातीयवाद रोखता आला. सर्वांना सामाजिक न्याय मिळून शांतता राखण्यात यश मिळाले. याबद्दल विशेष आभार मानण्यात आले आहेत. जुन्या नाशिकमध्ये समाजाच्या दत्तोबाचा मठ विठ्ठल मंदिराच्या नूतनीकरणासाठी आमदार निधीतून ताईंनी दोन कोटी निधी देऊन काम मार्गी लावले. पाठिंबापत्रावर सदानंद वनमाळी, अंबादास सुतसोनकर, प्रवीण वनमाळी, विश्वस्त भगवान पहाडी, सुभाष वनमाळी, लिंबाजी वनमाळी, अशोक वनमाळी, सुनील पहाडी, सल्लागार नंदू वनमाळी, ज्ञानेश्वर वनमाळी, तुळशीदास पहाडी, मंगेश गोलाईत, हेमंत पहाडी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा