नाशिक | Nashik
लोकसभेच्या (Loksabha) निर्णयानंतर सरकार घाबरले, ते ज्याला त्याला हो म्हणायला लागले. त्यांचे सरकार जाणार याची खात्री झाल्याने त्यांनी हजारो निर्णय घेतले. त्यांनी फक्त जाहिराती केल्या. लाडकी बहीण योजना आणली आणि सर्व वस्तूंच्या किंमती महाग केल्या, महाराष्ट्राची (Maharashtra) जनता महागाईला कंटाळली आहे. सर्व उद्योग गुजरातला गेले, मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द काढला नाही, यापेक्षा मोठा प्रकल्प मिळणार असे सांगत होते. मात्र, एकही प्रकल्प आला नाही असे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. नाशिक पूर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गिते (Ganesh Gite) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते.
हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”
यावेळी बोलतांना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, मोदी- फडणवीसमुळे महाराष्ट्र उत्पन्नात गुजरातपेक्षा खाली गेला. महाराष्ट्राची अधोगती चालली आहे, महागाई दुप्पट झाली आहे. श्रीमंतांचे चोचले नेपुरवीत महाराष्ट्राचे नुकसान केले आहे. महिला सुरक्षित नाहीत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मंत्रीमंडळात घेतले. मालवणला उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला, पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. स्मारक केले नाही, असे सांगत महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी (Women) महालक्ष्मी योजना राबवून महिलांना तीन हजार रुपये महिना, एसटीत मोफत प्रवास, कर्जमाफी, पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
हे देखील वाचा : Nashik Political : ‘ड्रग्जमुक्त नाशिक’ लढ्याच्या भितीने आ. फरांदेंविषयी तयार केला जातोय फेक नॅरेटिव्ह
तसेच प्रदेश सरचिटणीस यशवंत गोसावी यांनी ज्याने संविधान (Constitution) संपवायचे प्रयत्न केले, त्यांचे राजकारण जनतेने संपविले आहे. ज्यांनी नाशिक दत्तक घेतले, त्यांनी नाशिकचा काय विकास केला? सत्ता हे शस्त्र आहे. ते योग्य माणसांच्या हाती दिले पाहिजे. कितीही डमी उमेदवार उभे केले तरी काही फरक पडणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी खासदार भास्कर भगरे, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुनील गव्हाणे, माजी आमदार नितीन भोसले, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, पंडित पिंगळे, दिलीप मोरे, अतुल मते, लक्ष्मण मंडाले, गणेश काकड, हर्षद पटेल, कल्पना पांडे एजाज पटेल, अजय बागुल, योगेश काकड, प्रमोद पालवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ काकड यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भोसले यांनी केले.
हे देखील वाचा : छत्रपती संभाजी राजेंच्या विचारांचे उमेदवार गुरुदेव कांदे; जनतेने त्यांना विजयी करावे – केशवराव गोसावी
डमीबाबत विरोधकांचा प्लॅन फसला
नाशिक पूर्व मतदारसंघात गणेश गिते नावाचा डमी उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना वाटले होते की दोन्ही नावे एका खाली नावे येतील, मात्र त्यांचा प्लॅन फसला आणि डमीचे नाव शेवटच्या नंबरवर गेले, कुणीही येऊन गणेश गिते होऊ शकत नाही. गणेश गिते व्हायला खूप खस्ता खाव्या लागतात, अठरा अठरा तास काम करावे लागते मग गणेश गिते तयार होतो, असे यावेळी गणेश गिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
हे देखील वाचा : येवल्यात भुजबळांचे कुटुंब रंगले प्रचारात
दुचाकीला २८ तर हेलिकॉप्टरला ५ टक्के जीएसटी
आपल्या भाषणात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, बीजेपी सरकारने गरिबांना गरीबच रहावे, याकरिता विशेष व्यवस्था केली आहे. पन्नास हजाराची मोटारसायकल दीड लाखाला झाली. त्याच्यावर २८ टक्के जीएसटी लागतो. मात्र धन दांडग्यांनी हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तर त्यावर पाच टक्के जीएसटी लागतो. यावरून बीजेपी सरकार कोणत्या कोणासाठी काम करत आहे हे लक्षात येते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा