Thursday, November 14, 2024
HomeनाशिकNashik Political : कळवणवासीयांनो, विकासकामांना साथ द्या; आमदार नितीन पवार यांचा मतदारांशी...

Nashik Political : कळवणवासीयांनो, विकासकामांना साथ द्या; आमदार नितीन पवार यांचा मतदारांशी संवाद

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

कळवण शहर व तालुक्यात अपप्रचार करणाऱ्याकडे विकासाचे कुठलेही व्हिजन नाही, मतदारसंघात ओतूर, जामशेत धरणाच्या कामाबरोबर रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज या विभागाची अनेक कामे गावागावात झाली. कळवण शहरातील (Kalwan City) सर्व भागात विकासकामे पूर्ण केली. सुरगाणा तालुक्याचा (Surgana Taluka) विकास ज्यांना करता आला नाही ते कळवणकरांना विकासाचे स्वप्न दाखवत दिशाभूल करीत आहे. कळवणकरानो विरोधकांच्या अफवाना बळी पडू नका, विकासकामे करणाऱ्याना साथ द्या, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

गेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कळवणकर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या माध्यमातून शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवल्याने अनेक विकासकामे मार्गी लागली. कळवण शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असून मला पुन्हा आशीर्वाद देईल, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.कळवण- सुरगाणा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी कळवण शहरात नागरिकांच्या व व्यापारी बांधवांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

नगराध्यक्ष कौतिक पगार आणि नगरसेवक यांनी सुचवलेल्या विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. सर्व भागातील विकासकामे मार्गी लागली. मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याचा मी प्रयत्न केला. विरोधकांकडे मते मागायला मुद्दे नाहीत. त्यामुळे ते तालुक्यात व शहरात अपप्रचार करीत फिरत आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता तालुका व शहराच्या विकासासाठी मला आशीर्वाद द्या, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.शहरातील शिवाजीनगर परिसरात व सावरकर चौक, शाहीर लेन, लोकमान्य टिळक चौक, मेनरोड, रामनगर परिसरात आमदार (MLA) पवार यांनी मतदारांच्या (Voter) गाठीभेटी घेतल्या. ठिकठिकाणी महिलांनी आमदार पवार यांचे औक्षण केले. व्यापारी बांधवानी सत्कार केला.

हे देखील वाचा : माझ्यावर आणि विकासकामांवर जनतेचे प्रेम : आ.सीमा हिरे

दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार, जयेश पगार, अतुल पगार, खंडेराव निकम, गौरव पगार, राहुल पगार, एम.एल. पवार, चेतन मैंद, तेजस पगार, सुनील महाले, सागर खैरनार, संदीप पगार, राजेंद्र पगार, नंदकुमार पगार, गंगाशेठ सोनवणे, कैलास सोनार प्रविण बिरारी, राजू आहेर, उमेश सोनवणे, अरविंद कोठावदे, धीरज कोठावदे, वैभव कोठावदे, शहाबुद्दीन शेख इम्रान यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या