दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार ना, नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यासाठी सिनेअभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर हेच थेट प्रचाराच्या रिंगणात उतरले असून, आज नरहरी झिरवाळ यांनी हजारो दिडोरीकरांची (Dindori) मने जिंकली. हजारो दिंडोरीकर झिरवाळांच्या प्रचार यात्रेत सहभागी झाल्याने नरहरी झिरवाळ दिंडोरी शहरात मताधिक्य घेतील, असे चित्र निर्माण झाले आहे. दिंडोरी शहरात महायुती सरकारने केलेली कामेच घड्याळाला मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास ना. नरहरी झिरवाळ यांनी प्रचार सांगता रॅलीप्रसंगी व्यक्त केला.
दिडीरी शहरात सकाळपासूनच ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचाराच्या रॅलीची चर्चा सुरु होती. अनेक शेतकरी, महिला, युवकवर्ग नरहरी झिरवाळ यांच्या आगमनाची वाट पाहत होते. ना. नरहरी झिरवाळ व महायुतीच्या सरकारच्या वतीने दिंडोरी शहरात कोट्यवधी रुपयांचीकामे केली आहे. या कामामुळे जनता महायुती सरकारवर प्रचंड खुश आहे. उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी पुन्हा एकदा घडयाळालाच निवडून देणे आवश्यक असल्याचे मत जनतेने व्यक्त केले. त्यासाठी झिरवाळांच्या प्रचार यात्रेत हजारो दिंडोरीकर स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले.’झिरवाळ साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है’, ‘येवून येवून येणार कोण झिरवाळ साहेब शिवाय आहेच कोण?’, एकच बादा अजितदादा’, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा (BJP) विजय असो आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
बसस्थानक परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे प्रबाराचे मुख्य आकर्षण ठरले. सयाजी शिंदे व ना. नरहरी झिरवाळ यांचे आगमन होताब फटाक्याची प्रचंड आतशबाजी करण्यात आली. सयाजी शिंदे यांनी अनेकाबरोबर सेल्फी काढली. महिला वगनिही फोटो काढण्याचा आनंद लुटला. नाशिक कळवण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दुकादुकानामधून हात उंचावून व्यापारी बर्ग, सामान्य मतदार ना. झिरवाळांना अभिवादन करत होते. ना. झिरवाळ पण वाकून नमस्कार करत होते. जुने जाणते सर्वच व्यापारी ना. झिरवाळांच्या रॅलीत सहभागी झाले. घडयाळाला मतदान देण्यासाठी ते सुध्दा आवाहन करु लागले. शिवाजीनगर मार्गी पेठगल्ली व तेथून पुढे हनुमान चौकात रॅली आली. खंडेराव महाराज, हनुमान महाराज, गढीवरचा गणपती, साई महाराज मंदिर, मस्जिद, चेताळ महाराज मंदिर, जुने राम मंदिर, कृष्ण मंदिर, त्रिपुरारी सुंदरी देवी या सर्वांचे ना. झिरवाळ यांनी दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी महिलांनी ना. झिरवाळ यांचे औक्षण केले. ना. झिरवाळांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. प्रत्येक चौकात ना. झिरवाळांचे फटाक्याच्या आत्तशबाजीत स्वागत करण्यात आले.
झिरवाळांना सुध्दा अपेक्षा नव्हती की इतक्या प्रचंड प्रतिसाद दिंडोरी शहरात मिळेल, दिंडोरी शहराची प्रचंड लोकसंख्या लक्षात झिरवाळांना आजच विजयाचे गणित सोपे झाले आहे. आज निघालेली रॅली ही प्रचंड बळ देणारी ठरली असून त्यामुळे झिरवाळ दिंडोरी शहरातून किमान ५ हजारांची लीड घेतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. शिरबाळांच्या एकंदरीत प्रचार फेरीने दिंडोरी शहरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक मतदारांनी झित्वाळांनाच मतदान करण्याचा संकरूप बोलून दाखवला. झिरवाळांचा वाढता प्रस्त विरोधकांच्या उरात धडकी भरवणार ठरलं. विशेष म्हणजे मुस्लीम महिलांनी सुध्दा ना. झिरवाळांच्या प्रचार सभेत सहभाग घेतला. या प्रचार रॅलीत महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, नागरिक, युवक, युवती, वयोवृद्ध आदी सहभागी झाले होते. यावेळी युवतींनी ना. झिरवाळांचे स्वागत केले.
झिरवाळांची विजयाकडे वाटचाल
ना. नरहरी झिरवाळ यांना अनेक समाज घटकांची मदत होत आहे. झिरवाळ यांनी आपल्या चांगल्या स्वभावावर अनेक माणसे जोडली, अनेक रुग्णांना मदत केली. त्यांचे सर्व आशीर्वाद ना. झिरवाळ यांना मिळत आहे. दिंडोरी-पेठ मतदार संघात ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत सुमारे सव्वा लाख महिलामा योजनेचा लाभ झाला. या योजनेतून महिलांना दिवाळी चांगली गेली. काहींनी व्यवसाय सुरु केला. काहींचा शिक्षणाचा प्रश्न सुटला. यामुळे सर्व महिला भगिनी योजना सुरु रहावी यासाठी झिरवाळांनाच मतदान करणार आहे. याशिवाय तालुक्यात साहेबांचा आशिर्वाद, डेखळे गट, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी कीस, रिपाई, भाजपची ताकद सर्व झिरवाळ यांना मिळत आहे. या सर्वांची मते एकत्रित केली तर झिरवाळांना मताधिक्य मिळेल, असे चित्र आहे. अनेक यंत्रणाचा अहवाल सुध्दा तसाच आहे. दिंडोरी पूर्व भागात बहुजन समाज तसेच आम्बेडकरी समाज ना. झिरवाळ यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते सुध्दा झिरवाळ यांच्याशी स्वभाचामुळे जवळीक साधुन आहे. म्हणून झिरवाळ यांचे विजयाकडे वाटचाल दिसून येत असून त्यांचा विजय आजच निश्चित झाल्याचे रा.कॉ. शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा