दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
जातीवाद करणे हा आपला स्वभाव नाही. आपण आपल्या स्वभावावर आणि विकासकामांवर (Development Works) निवडणूक लढवत आहे. तरी सुध्दा विरोधक जातीवाद करुन विष पेरत आहे. आपण मराठा समाजासाठी झटलो आणि दिनदलित, ओबीसी, आदिवासी समाजासाठीही झटलो. मराठा समाजासाठी आणि आदिवासी समाजासाठी विरोधक उमेद्वारांचे योगदान काय? असा सवाल महायुतीचे (Mahayuti) उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांनी विचारला असून विरोधकांना एक तरी चांगले काम स्वतः केल्याचे दाखवण्याचे आवाहन केले आहे. वरखेडा येथे प्रचार सभेत ना. झिरवाळ पुढारी ठेकेदारांवर कडाडून हल्ला केला. ना. नरहरी झिरवाळ यांचा वरखेडा, आंबेवणी, खडकसुकेणे, कोहाटे, कुर्णोली परिसरात लाखो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला. वरखेडा येथे प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी किसन भुसाळ होते. व्यासपीठावर काट्वा कारखान्याचे माजी संचालक जे. डी. केदार, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, माजी नेते सुरेश डोखळे, प्रकाश शिंदे, सदाशिव शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, नरेंद्र जाधव, किशोर कदम, विनोद देशमुख, विष्णूपंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. झिरवाळ यांनी झालेली विकासकामे याबाबत उपस्थित जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला व अनके विकास कामे करायची असून मला तुमची साथ हवी असून मला येत्या निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन केले. वणी गटातील ग्रामपंचायतींच्या इमारतीचे कामे, रस्ते सुविधा, आरोग्य प्रश्न महिला वर्गाच्या संरक्षणाचा प्रश्न, तरुण वर्गासाठी लाभीक योजनांसाठी असणे आवश्यक आहे. हरिभाऊ महाले यांची मला शिकवण आहे. की कधी बदलायचं नाही व कथी गद्दारी करायची नाही. धनराज महाले हे हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहे. मी हरीभाऊंचा शिष्य असून महाले यांचे तत्व सत्याचे आहे. धनराज महाले वचनांचे पक्के आहे. त्यामुळे विरोधकांनी पैशांचे अमिष दिले तरी फसणार नाही. तरी पण बदनामी करीत असेल तर प्रत्येकाचा लेख जोखा वरच्याकडे आहे तो वरून पाहतो. आपण रोज त्याला नमस्कार करतो कारण देवाला असा खोटारेडेपणा चालत नाही. जर तुम्हाला निवडूनच जायचं आहे तर जनतेला काय आश्वासन द्यायचे ते द्या पण बदनामी कटकारस्थाने करु नका. या आधी तुम्ही पण विधानसभेत जाऊन आले आहे आणि मी पण विधानसभेत जाऊन आलो आहे. त्यामुळे एक तरी असे काम सांगून दाखवा कि जनतेच्या मनात बसेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली त्या घटनेला जगभर मागणी आहे. परदेशातील अभ्यासक लोकशाहीसाठी तिची पीएचडी करतात आणि त्याची अजूनही त्याना नकल जमली नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हुशार होते आणि त्यांना तुम्ही करता व जाती-जातीत तिढा निर्माण करतात, असेही ना. झिरवाळ म्हणाले.
ना. झिरवाळ यांनी सांगितले की, आता जनता पहिल्या सारखी खुळी नाही. तसेच तुम्ही जातीजातीमध्ये तिढा निर्माण करीत आहे. त्यांनी सांगून दाखवावे की, मराठा आंदोलनात एखादा दिवस त्यांनी प्रतिक्रिया दर्शविली असेल तर मी येथून घरचा रस्ता धरेल असे उदगार ना. नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी वरखेडा, आंबेवणी प्रचार सभेत काढले. मराठा आंदोलन असेल तर मराठा समाजाबरोबर गेले पाहिजे किंवा अजून एखाद्या समाजाची मागणी असेल तर त्यांच्याबरोबर हि गेले पाहिजे. विरोधकांनी आदिवासी सामाजहितासाठी कधी भाषण करले का? किंवा एखाद्या आदिवासी दिला का असे विरोधकांनी सांगावे. दिवस आंदोलने करीत होते व गाळागुळात मुले झोपली होती तेव्हा विरोधकांनी एखाद्या दिवशी चहा नका पाजू पण जेवण तरी युवक वर्गाला दिले का? तसेच विरोधकांनी लिहून द्यावे कि, आदिवासी समाजाचे सुप्रीम न्यायालयात केस चालू असून यासाठी लाखो रुपये लागतात पण विरोधकांनी या केससाठी एक रुपयाही दिला नाही. पावती तर सोडा एखादा माणूस उभा करावा कि, समाजासाठी मी सुद्धा मदत केली आहे. विरोधकांनी फक्त विरोध करून आपला डाव साधत असून आयत्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार सुरु केला असल्याचेना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी नरहरी झिरवाळ यांच्या आक्रमक पवित्र्याने आणि जनतेने ना. झिरवाळांना असल्याचे सांगितले. ना. झिरवाळांनी सर्व अबालवृध्दांचे आशिर्वाद घेतले आणि पूर्व भागातील जनतेने त्यांना विजयाचा शब्द दिला.