दिंडोरी | Dindori
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची दिंडोरी तालुक्यावर (Dindori Taluka) विशेष प्रेम आहे. अजितदादा पवार यांच्यामुळे दिंडोरी शहराला व तालुक्याला कोट्यवधी रुपये विकासासाठी दिले. वणी खुर्द, ओरण, आंबाड या लघुपाटबंधारे प्रकल्पात आज प्रचंड पाणी साठून परिसरात समृध्दी निर्माण झाली आहे. या तिन्ही प्रकल्प अजितदादा पवार यांच्यामुळे उभे राहिले असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केले. नळबाडपाडा, ता. दिंडोरी येथे ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक झाली. त्याप्रसंगी ना. झिरवाळ यांनी राष्ट्रबादी काँग्रेस अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या कामाचे कौतुक करून दिंडोरी तालुक्याला दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख
ना. नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले की, २००९ च्या निवडणुकीत (Election) माझा १४९ मतांनी पराभव झाला होता. मी दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो व मंत्रालयात जोरण, आंबाड, वणी खुर्द प्रकल्पाचा प्रश्न अजितदादा पवार यांच्याकडे गेलो. त्यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितले की, तु कशाला कामे घेवून येतो, तुझा पराभव जनतेने केला आहे. त्यावेळी मी सांगितले की, १४२ मलेच माझ्या विरोधात होती, बाकी सर्व जनता आपल्या बरोबर होती. परंतु अजितदादा पवार यांनी कार्यालयात प्रतिसाद दिला नाही. परंतु प्रधान सचिवांना भेटायला गेलो त्याचवेळी अजितदादा पवार यांनी वणी खुर्द, जोरण, आंबाड येथील पाणी प्रकल्प मंजूर करून पुढील कार्यवाही केलेली होती. आज या प्रकल्पात पाणी साठा झाला असून आदिवासी भागात हिरवी क्रांती झाली आहे. ही सर्व अजितदादा पवारांचे आपल्या परिसरावर केलेले उपकार असून, या उपकराची फेड आपण घड्याळाला मते देवून विजयी करावे, असे आवाहन ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : प्रवाशांचे दागिने चोरणारा गजाआड
यावेळी ना. नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील (Taluka) वीज प्रश्नांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, दिंडोरी तालुक्यात शेतीसाठी (Agriculture) पुरेसी वीज मिळत नव्हती. परंतू आपण प्रयत्न करुन म्हसरूळ व देवसाने येथे विद्युत वीज उपकेंद्र मंजूर केले व वीज पुरवठ्याचे नियोजन केले.अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र दिल्या त्याचा परिणाम आज वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. महायुती सरकारने (Mahayuti Government) अनेक महत्त्वपूर्ण जनतेच्या विकासासाठी राबविल्या असून त्याचा फायदा सामान्य जनता व शेतकन्यांना होत आहे, असे ना. झिरवाळ यांनी सांगितले. ना. झिरवाळ यांच्या भाषणाचे सर्वांनीच कौतुक केले व ना. झिरवाळांना उमराळे बु.कोचरगाव गटातून प्रचंड मताधिक्य देवू, असे आश्वासन जनतेने दिले.
हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
भाजपचा ना.झिरवाळांनाच पाठिंबा -बोडके
नळवाडपाडा येथे झालेल्या जाहीर सभेत माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप नेते शाम बोडके यांनी भाजप उमराळे बु. गटातून ७० टक्के मतदान मिळवुन देईल, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. शाम बोडके यांनी सांगितले की, उमराळे बु. गटात ना. नरहरी झिरवाळ यांनी कोट्यवधी रुपयांचे विकासकामे मंजूर केली. त्यामुळे अनेक गावांमध्ये विकासाच्या योजना पोहचल्या. दवाखाने, रस्ते, पुल आदी मुलभूत सुविधा दिल्या. ना. हिरवाळ यांना निवडून दिल्यानंतर नक्कीच ते आदिवासी विकास मंत्री होतील, असे शाम बोडके यांनी सांगितले. यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा