नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधानसभा निवडणुकीसाठी मध्य नाशिक मतदारसंघातील (Nashik Central Assembly Constituency) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aaghadi) वसंत गिते (Vasant Gite) यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिली आहे. खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातूनही ही बाब अधोरेखीत झाली आहे. त्यामुळे गेल्या चार दशकापासून सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याने अढळस्थान निर्माण करणारे वसंत गिते हेच नाशिकला प्रगतीपथावर नेऊ शकतील, असा ठाम विश्वास सर्वस्तरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मुशीतून वसंत गिते यांचे नेतृत्व बहरले. आक्रमक कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार असा त्यांच्या प्रवासाचा आलेख चढता राहिला. नाशिक महापालिकेत बिनविरोध निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदवला आहे. महापौर म्हणून शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. २००९ मध्ये नाशिक मध्य विधानसभेचे आमदार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) गिते यांची रणनिती यशस्वी ठरली. सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नाशिकचा गड लीलया जिंकला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गिते यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरलेले शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस तसेच घटक पक्षांची भक्कम साथ यामुळे गिते यांनी प्रारंभापासूनच आघाडी घेतली. नाशिककरांसाठी वचनांची पंचसूत्री देणारे ते एकमेव उमेद्वार ठरले. स्वतःचा वचननामा जाहीर केल्याने ही बाब मतदारांना अधिक भावली. भयमुक्त व ड्राजमुक्त नाशिक, तरुणाईच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीची कोंडी सुटणार, गोदामाईचे संवर्धन यासारखी बचनांची पंचसूत्री जाहीर करून त्यांनी विधीमंडळातील आगामी चाटचालीचे संकेत दिले. त्यामुळेच जात-पात, धर्म, राजकीय मतभेद बाजुला सारून शहरातील सर्वच घटक वसंत गिते यांच्या पाठीशी एकवटला आहे. शेकडो कुटुंब आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे वसंत गिते यांना मिळणारे समर्थन दिवसेंदिवस वाढत असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा