पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील (Nashik East Assembly Candidate) विकासाचा चेहरा असलेला आमदार म्हणून प्रसिध्द असलेल्या महायुतीचे भाजपचे उमेदवार आ. ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी जेलरोड परिसरात निर्माण केलेल्या प्रचाराच्या वादळाने त्यांच्या आक्रमक शैलीने विरोधकांना धडकी भरली. प्रचारसभेला झालेली मतदारांची उत्स्फूर्त गदीं ढिकले यांच्या विजयाची नांदी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आ. ढिकले यांच्या प्रचारार्थ नाशिक पूर्व मतदारसंघातील जेलरोड परिसरात श्री संत नरहरीनगर भागात प्रचारसभा पार पडली.
व्यासपीठावर नाशिकरोड विभागाचे माजी सभापती विशाल संगमनेरे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शरद मोरे, सचिन हांडगे, मीराबाई हांडगे, सुरेखा निमसे, कुंदा शहाणे, शंकर बोराडे, अरुण माळवे, राहुल बेरड, सुनील घोंगडे, संतोष कांवळे, प्रशांत कळमकर, प्रमोद दिडे, शंतनू निसाळ, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. ‘दादागिरी करणान्यांनो सावधान, दारुच्या दलालांनो जर तुम्ही जनतेला आस दिला तर तुमचा सामना माझ्याशी आहे. मी फक्त वकील नाही तर पहिलवानही आहे. कायद्याची ताकद आणि शरीराची बळकटी दोन्ही माझ्याकडे आहेत, हिम्मत असेल तर समोर या अशा शब्दांत द्विकले यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.
‘वेळ आली की खोटेपणाचा बुरखा फाटतोच, असे नमूद करत जेलरोड माझे अन् मी जेलरोडचा आहे. जेलरोडवासियांवर अन्याय सहन करणार नाही, जनता जागी झाली आहे. आता कुणालाही जनतेच्या भावनांशी खेळू देणार नाही, असा इशाराही ढिकले यांनी विरोधकांना दिला, सोनार समाजाला उद्देशून ढिकले यांनी आदर व्यक्त केला, तुम्हाला खऱ्या सोन्याची पारख आहे. खन्या खोट्याची जाण आहे. तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून आणाल यात शंका नाही. ज्यांनी प्रचार कार्यालयातच दारूची दुकाने उघडली अशा बेजबाबदार लोकांना तुम्ही घडा नक्कीच शिकवाल, उत्सा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रभू श्रीरामाची सर्वांत मोठी ७० फुटी मूर्तीची उभारणी, २४२ कोटीची पाणीपुरवठा योजना आदी विकासकामांची आठवण करून देत त्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले.
मतदारांकडून (Voter) उत्स्फूर्त स्वागत जेलरोड परिसरातील गोकुळधाम अपार्टमेंट, भैरवनाथ नगर, ऐश्वर्या रो-हाऊस, प्रगती नगर, विमलनगर, ब्रीजनगर,वाघेश्वरी सोसायटी, हिंदनगर, श्री संतनरहरीनगर, सुवर्णनगर, संभाजीनगर, सदूरू नगर, शिवशक्तीनगर, मॉडेल फॉलनी, टाकेकर बसाहत, बसंत विहार, माळी कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, भगवा चौक, ढिकलेनगर, जयंत्तनगर, आदी प्रभाग क्रमांक १७ व १८ परिसरात अॅड. ढिकले यांनी प्रचारदौरा करत मतदारांशी साधला.संवादावेळी मतदारांनी ठिकठिकाणी त्यांचे अस्फूर्त स्वागत केले. सुवासिनीनी त्यांचे औक्षण करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी प्रियंका शैलार, मोनिका पठाडे, शारदा काकडे, संगीता डापसे, किरण शेलार अविनाश बगाडे, विजय गाडे, तुषार पाटील, मनोज अहिरे, गोपीनाथ कांबळे, केदु पाटील अभय टिल्ल, बुन्हाडे काका, रखी आबारी, ज्ञानेश्वर गायकवाड, चाळू गोतरणे, राजू बरकले, कल्पना सोनवणे सुरेख बाथ, रेणुका चौधरी अश्विनी मोरे अलका यादव, अश्विनी थोरात, शीला सूर्यवंशी, दर्शन शहाणे, सचिन टिळे स्वप्नील वर्षे यांच्य्यासह आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा