Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी २४ अर्जाची विक्री; तीन माजी आमदारांनी...

Nashik Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी २४ अर्जाची विक्री; तीन माजी आमदारांनी नेले अर्ज, निवडणुकीत चुरस वाढणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी (Election) तीन दिवसांत एकूण २४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. माजी आमदार नरेंद्र दराडे, दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी अर्ज (Application) घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २५ मे रोजी सर्वाधिक ८ अर्जाची विक्री झाली. यामध्ये फिरोज गफूर शेख, प्रतीक प्रभाकर खराटे, केदा तानाजी आहेर, अजित हिरामण पवार तसेच माजी आमदार नरेंद्र भिकाजी दराडे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज (Independent Candidacy Application) घेतले. २६ मे रोजी एकूण ९ अर्जाची विक्री झाली. यात सुनील रंगनाथ सानप यांनी अपक्ष, शान हिंद निहाल अहमद यांनी समाजवादी पार्टीतर्फे, मोहम्मद खलील अब्दुल रशीद यांनी इस्लाम पार्टीतर्फे, तर प्रसाद जामखिडीकर यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज घेतला.

याच दिवशी माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने अर्ज घेतले. २७ मे रोजी ७ अर्जाची विक्री झाली. विजय देवीदास धारराव यांनी अपक्ष, गोरख देवराम बोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने अर्ज घेतला. तर बालकृष्ण मधुकर माळी आणि भूषण जयचंद कासलीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज घेतले. विशेष म्हणजे, बालकृष्ण माळी यांनी अपक्ष उमेदवारीसाठीही स्वतंत्र अर्ज घेतला आहे.

दरम्यान, २७ मे अखेरपर्यंत एकाही इच्छुक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक संभाव्य उमेदवार शुभ मुहूर्ताची व पक्षश्रेष्टींच्या संकेताची वाट पहात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विविध पक्षांकडून अधिकृत उमेदवारी आणि एबी फॉर्म (AB Form) जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, बनावट PMO अधिकाऱ्याला...

0
मुंबई । Mumbai व्हीव्हीआयपींच्या उच्चस्तरीय सुरक्षेचा गढ मानल्या जाणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक...