Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News: पक्षप्रवेशाचा सामान्यांना फटका; वाहतुक कोंडीमुळे सीबीएस, शालिमार, गडकरी चौकातील वाहतूक...

Nashik News: पक्षप्रवेशाचा सामान्यांना फटका; वाहतुक कोंडीमुळे सीबीएस, शालिमार, गडकरी चौकातील वाहतूक काही काळ ठप्प

नाशिक | प्रतिनिधी
शहरातील एन.डी. पटेल रस्त्यावरील भाजप कार्यालयात गुरुवारी (दि. २५) झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे मध्यवर्ती नाशिकच्या काही मध्यवर्ती भागांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
दुपारच्या सुमारास प्रवेश घेणारे पदाधिकारी, त्यांचे समर्थक आणि भाजपचे नेते मोठ्या संख्येने कार्यालयात दाखल झाल्याने परिसरात अक्षरशः वाहनांचा महापूर आला. कार्यक्रमासाठी आणलेल्या महागड्या चारचाकी, एसयूव्ही आणि दुचाकी वाहनांनी अरुंद रस्त्यांवर तसेच मुख्य मार्गांवर वेडीवाकडी पार्किंग के ल्याने शहराच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. या गोंधळाचा फटका गडकरी चौक, सीबीएस, त्र्यंबकनाका सिग्नल, शालिमार, अशोकस्तंभ, सारडा सर्कल आणि एमजी रोड या प्रमुख वाहतूक मार्गांना बसला. सिग्नलवरून पुढे जाणारी वाहने अडकून पडल्याने काही ठिकाणी तर पाच ते दहा मिनिटांत पार होणारा प्रवास अर्धा ते एक तास लांबला.

हे ही वाचा: Prashant Jagtap: “राजकारण बंद करेन पण काँग्रेसमधून…”; प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

- Advertisement -

रुग्णवाहिका, शालेय वाहने, खासगी बस आणि कार्यालयीन वेळेत निघालेले कर्मचारीही या कोंडीत अडकले. अचानक निर्माण झालेल्या कोंडीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्वकल्पना असूनही योग्य नियोजन, पार्किंगची व्यवस्था आणि पर्यायी मार्गांची अंमलबजावणी न झाल्याने पोलिसांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी पोलिसांनी वाहने हटवली, तर काही रस्ते तात्पुरते एकेरी करण्यात आले. नागरिकांनी राजकीय कार्यक्रमांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अशी बेफिकीर गर्दी जमवण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकीय कार्यक्रमांचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याने भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी कडक नियोजन आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...