Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Political: गणेश गितेंच्या प्रचाराने विरोधकांना धास्ती

Nashik Political: गणेश गितेंच्या प्रचाराने विरोधकांना धास्ती

बाईक रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग

पंचवटी | प्रतिनिधी
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते यांची परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. युवकांसोबत पंचवटी विभागामध्ये बाईक रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचले.

नाशिक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रचार करताना गुरुवारी (दि. १४) पंचवटी येथील मालेगाव स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून प्रचाराची सुरुवात केली. यानंतर मालविय चौक, सरदार चौक, शनी चौक, राम मंदिर, शिवाजी चौक, गजानन चौक, नाग चौक, चरण पादुका रोड येथे नागरिकांची भेट घेतली. ठीक ठिकाणी नागरिकांनी गितेंचे औक्षण व स्वागत केले.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political: वसंत गितेंची मोटारसायकल रॅली; मध्य नाशिक दुमदुमले

यावेळी सर्वांच्या उत्साह बघण्यासारखा होता. प्रचाराला तो अधिक बळकटी देणारा ठरत आहे. गणेश गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात पंचवटीत अनेक विकासकामे केली आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. पेठरोडच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सभापतीपदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शहराला उपयुक्त व साजेशी ठरणारी विकासकामे यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल जिव्हाळा दिसून आला.

नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
संपूर्ण प्रचार काळात ठिकठिकाणी होणाऱ्या रॅलीमध्ये गणेश भाऊ गिते यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विकास हेच ध्येय असणारा लोकप्रतिनिधी पुढील काळात नागरिकांना मिळणार असल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर पूर्व विधानसभा मतदारसंघात वाढत असलेली गुंडागिरीतून मार्ग निघण्यासाठी व भयमुक्त नाशिक होण्यासाठी गितेंना निवडून देण्याचा निर्धार नागरिक करत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...