नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार (Candidate) भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्या प्रचार रॅलीने मखमलाबाद गाव व परिसर दुमदुमून गेला. ‘येऊन येऊन येणार कोण, राहुल ढिकलेंशिवाय आहेच कोण’, ‘महायुतीचा विजय असो’, अशा घोषणांनी यावेळी प्रचारात रंगत आली. केंद्रात भाजपची (BJP) सत्ता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला भरीव निधी आणण्यासाठी तसेच सिंहस्थाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी राहुल ढिकले यांना पुन्हा आमदार करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार यावेळी मखमलाबादकरांनी व्यक्त केला.
ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ मखमलाबाद गाव व परिसरातील शांतीनगर, बडजाईमाता नगर, पेठरोड, ओंकार नगर, पिंगळे नगर, बोरगड परिसर, गोरक्षनगर, गुलमोहरनगर, साईनगर, ओंकार कॉलनी, कलानगर, शिवगंगानगर आदी परिसरात बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी ढिकले यांनी मतदारांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Political) दिशा देणारी ही निवडणूक असल्याचे सांगत नाशिक पूर्व मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन ढिकले यांनी केले. आपल्या पाठपुराव्यामुळे नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारले जात आहे. हिंदूत्वाचा जागर करण्यासाठी तपोवनात श्रीरामांची ७० फूटी मूर्ती उभारण्यात आली असून यामुळे पर्यटनाच्या रुपाने रोजगार उपलब्ध होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Kumbhmela) यशस्वी नियोजन करण्यासाठी मतदारांच्या मतरुपी आशीर्वादाची गरज असल्याचे ढिकले यांनी सांगितले.
दरम्यान, या बाईक रॅलीत माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, नारायण काकड, तानाजी पिंगळे, संजय फडोळ, शंकर पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, चित्रा तांदळे, ज्ञानेश्वर काकड, वाळू काकड (पहिलवान), ज्ञानेश्वर पिंगळे, राजेश पिंगळे, मनोज चारसकर, भारत काकड, सचिन पिंगळे, अमोल पिंगळे, धनंजय खोडे, राहुल काकड, उदय काकड, आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा