Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik Political : दहशत रोखण्यासाठी सीमा हिरेंना निवडून द्या; ज्येष्ठ नेते मामा...

Nashik Political : दहशत रोखण्यासाठी सीमा हिरेंना निवडून द्या; ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nashik West Assembly Constituency) गुंडगिरी आणि दहशतीला रोखायचे असेल आणि मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था राखायची असेल तर भाजप महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सीमा महेश हिरे (Seema Hiray) यांना निवडून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी केले.आज सकाळी सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरातून उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली. शुभारंभावेळी ठाकरे बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण सिडको, सातपूर, इंदिरानगर भागाच्या विकासासाठी हिरे यांनी दहा वर्ष मेहनत घेतली असून, विकासाला अधिक गती देण्यासाठी त्यांना विक्रमी मताधिक्याने (Majority Vote) निवडून देण्याचे आवाहन ठाकरे यांनी मतदारांना केले.नवीन नाशिकमध्ये विविध भागात सध्या सीमा हिरे यांच्या प्रचार फेन्यांचा धडाका सुरू केला आहे. काल सिडकोतील संभाजी स्टेडियम, अश्विननगर, सह्याद्री नगर, अंबड पोलीस स्टेशन परिसर, सिंहस्थनगर, मोरवाडी गाव, पंडितनगर, भाद्रपद सेक्टर आदी परिसरातून सकाळी प्रचार फेरी काढण्यात आली.

हे देखील वाचा : ‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील

यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी (Citizen) आमदार हिरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्वागतासाठी लोक स्वतः हुन घराबाहेर पडत होते. गल्लीबोळातून अनेक जण स्वयंस्फूर्तीन प्रचारफेरीत सहभागी झाले. प्रचारफेरीत उमेदवार सीमा हिरे यांच्या समवेत मामा ठाकरे, दिलीपकुमार भामरे, चंद्रकांत खाडे, राकेश दोंदे, श्याम कुमार साबळे, सनी रोकडे, कावेरी घुगे, मंदाकिनी जाधव, सोनाली ठाकरे, रवी पाटील, गोबिंद घुगे, रेखा लिंगायत, यशवंत नेरकर, छाया परेवाल, हर्षा फिरोदिया, संजय गुंजाळ, जयश्री भावसार, ललिता भावसार, नलिनी दराडे, डॉ. विनय मोगल, सुष्मिता लांडगे, पिंटू काळे, नलिनी दराडे, रोहन कानकाटे, प्रचीण सोनवणे, समाधान दातीर, अरुण दातीर, यशवंत पवार आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

हे देखील वाचा : निफाडचा सुवर्णकाळ गुरुदेव कांदे परत आणणार : दत्तू बोडके

दरम्यान, प्रचारफेरीनंतर सीमा हिरेंसह महायुतीचे (Mahayuti) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील १७ हजार नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचवटीतील जाहीर सभेसाठी खाना झाले. मोदींच्या सभेसाठी जाताना मतदारांच्या चेहऱ्यावर एक आगळा उत्साह पाहायला मिळाला. भाजप, महायुती आणि सीमा हिरे यांच्या विजयाचा जयघोष यावेळी करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या