Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Political : महायुती सरकार जनतेविरोधी असल्याने सत्ताबदल करा - शरद पवार

Nashik Political : महायुती सरकार जनतेविरोधी असल्याने सत्ताबदल करा – शरद पवार

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन करण्यात आली. मोदी सरकार सामान्य जणतेविरोधात निर्णय घेत असते. राज्यातील महायुती सरकार (Mahayuti Government) सुद्धा जनतेविरोधात असून यावेळी सत्ता बदल करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी केले. दिंडोरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीत सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नांदगावला कळवाडी गटात समीर भुजबळांची बैलगाडीतून रॅली

YouTube video player

शरद पवार पुढे म्हणाले की, लोकसभेला (Loksabha) ३०० ते ३२५ जागांची गरज असतांना मोदी ४०० जागा मागत होते.मात्र यामुळे त्यांच्या हेतुवर संभ्रम निर्माण झाला व यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचवीण्यासाठी जनतेने पण त्यांचा ४०० पारच्या नार्‍याला केराची टोपली दाखविली. सुनीता चारोस्कार सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला या तालुक्यातील नेते व जनतेने उमेदवारी द्यायला लावली.आज शेती व्यवसाय धोक्यात चालला आहे. कांद्याला (Onion) दोन पैसे मिळाले तर त्याची निर्यात बंद केली, सरकार शेतीविरोधी निर्णय घेत आहे याला आवर घालण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Political : ‘प्रचंड’ विकासकामांमुळे झिरवाळांचा विजय निश्चित

पुढे ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना चांगली आहे पण ९६० बहिणीचा शोध लागत नाही त्या गायब आहे यावर काही उपाययोजना दिसत नाही.आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेतून महिलांना तीन हजार दिले जातील, तसेच कोणत्याही राज्यात त्यांना मोफत प्रवास करता येईल. तीन लाखांचे कर्ज माफ व नियमित कर्ज भरणार्‍यास पन्नास हजार सानुग्रह अनुदान, जातीय जनगणना, चार हजाराची मदत, वैद्यकीय मदत होण्यासाठी २५ लाखांचा आरोग्य विमा व लागणारी औषधे मोफत देण्यात येतील. आज शेतमालाला बाजार भाव नाही,शेतकरी आत्महत्या करत आहेत. मोदींनी व्यवसायिकांचे १४ हजार कोटींचे कर्ज माफ केले मात्र शेतकर्‍याचे हाल त्यांना दिसले नाही.महाराष्ट्राचे पाणी गुजरातमध्ये जाण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे यांना कायमस्वरूपी धडा शिकवावा लागेल,असेही शरद पवारांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतमजूर, शेतकरी, नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....