दिंडोरी | Dindori
ननाशी ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची मंजूरी मिळवून देवून ना. नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी पश्चिम भागावर उपकार केले आहे, जनता त्यांना घड्याळाला मतदान देवून उपकाराची परतफेड करेल, असे प्रतिपादन ननाशीचे ज्येष्टनेते शेखरनाना देशमुख यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील नळबाडापाडा येथे ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ बैठक झाली. त्याप्रसंगी २०० आदिवासी पाडे व गावे शेतकऱ्यांनी ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला. वावेळी शेखरनाना देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख होते.
शेखरनाना देशमुख पुढे म्हणाले की, शिक्षण, दळणवळणाच्या क्षेत्रात ना. नरहरी झिरवाळ यांनी प्रचंड कामे उभी केली आहे. दिंडोरी पश्चिम भागात नवीन उपकेंद्रांना मंजूरी मिळवून दिली आहे. दिंडोरी शहरापासून ननाशी दूर आहे. येथे रुग्णांची गैरसोय होत होती. वाढत्या लोकसंख्यानुसार ननाशीचे ग्रामीण रुग्णालय कमी पडत होते. रुग्णांना नाशिक, दिंडोरी येथे उपचार ध्यायला खर्च लागायचा. परंतू ना. झिरवाळ यांनी आपल्या पाठपुराव्याने ननाशी येथे ३० खाटांचे रुग्णालय मंजूर केले. त्याचा फायदा ननाशी नव्हे तर दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील जनतेला होणार आहे.सर्वसामान्य आदिवासी बांधवांना आधुनिक उपचार मिळावे, असा खटाटोप ना. नरहरी झिरवाळ यांचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण ना. झिरवाळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करु, असे शेखर देशमुख म्हणाले.
यावेळी कोचरगाव, उमराळे बु. गटातील सर्वच वक्त्यांनी ना. झिरवाळ यांना विजयी करण्याचा संकल्प सोडला.तर चिंतामण गांगोडे यांनी सांगितले की, ना. झिरवाळ यांच्यामुळे प्रचंड कामे आली. ना. नरहरी झिरवाळ हे निश्चित कैबिनेट मंत्री होतील. पाडे येथील सुधाकर व्यक्ती उच्च पदावर पोहचली ती सामान्यांचा विसर पडतो, परंतू ना. झिरवाळ यांनी सामान्यांना कधीही दुर लोटले नाही. हाच आपल्याला आमदार झाल्यानंतरही विसरणार नाही. पाडे परिसरात एकही रस्ता आता अपूर्ण नाही. खुप कामे मंजूर केली आहे.
यावेळी भाऊर येथील सोमनाथ चौधरी यांनी सांगितले की, दिंडोरी, पेठ तालुक्यातील जनतेने कधी आमदार निवास मुंबई पाहायली नव्हती पण ना. नरहरी झिरवाळ यांनी सामान्य जनतेला स्वतःच्या बगल्यात राहण्याची व्यबस्था करेन दिली. त्यांचे प्रश्न सोडविले, विधानभवन, मंत्रालय दाखविले. ना. नरहरी झिरवाळ स्वतः फोन उचलतात व उत्तर देतात. त्यामुळे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दुर्मिळ रत्न आहे, असे सोमनाथ चौधरी यांनी सांगितले. यावेळी पुंडलिक अपमुदे यांनी सांगितले की, जांबुटके परिसरात ना. हिरवाळ यांनी अनेक योजना देवून एमआयडीसी मंजूर केल्याने आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव वाढले आहे. असा लोकनेत्याच्या मागेच आम्ही उमराळे बु. गटातील जनता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते शाम बोडके यांनी ना. झिरवाळ यांना भाजपच्या वतीने पाठिंबा दिला.
भाजप संपूर्णपणे ना. झिरवाळांच्या पाठीशी उभे राहील व ७० टक्के मतदान उमराळे बु. गटातून मिळवून देवू, असे आश्वासन भाजप नेते शाम बोडके यांनी दिले. माणिक बाधेरे यांनी सांगितले रखडलेल्या भरती प्रक्रिया ना. झिरवाळ यांच्यामुळे सुरु झाल्या, अनेक मुलांना रोजगार मिळाला. महाराष्ट्रातील अनेक मुले ना. झिरवाळ यांना पाठिंबा देण्यासाठी दिंडोरी तालुक्यात येत आहे. ना. झिरवाळ हे गोरगरिबांचे दैवत झाले आहे. नळवाडपाड्याचे सरपंच हिरामण गावित यांनी सांगितले, जर डिंडोरी तालुक्याला विकासाची गंगा आणायची असेल तर पुन्हा एकदा ना. झिरवाळांनाच विजयी करावे लागेल. अनेक गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी ना. झिरवाळ यांनी दिला. त्यामुळे अनेक गावातील सरपंच आणि अनेक गावे ना. नरहरी झिरवाळ यांच्या पाठीशी राहतील, असे हिरामण गावित यांनी म्हणाले.
दरम्यान, यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश बडजे, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, गणपतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, भाजप तालुकाध्यक्ष शाम मुरकुटे, रायुको तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, घनशाम जाधव, कृष्णा मातेरे, नरेंद्र पेलमहाले, रंगनाथ कामाले, अरुण धात्रक, नीलेश पेलमहाले, चारोलेचे सरपंच नाना गायकवाड, महाजेचे सरपंच वसंत भोई, यश पवार, काका बडजे, गणेश गवळी, संजय केदार, सुधाकर महाले, अशोक टोंगारे, अमोल खांदवे, अस्करी मिर्झा, चिंतामण गांगोडे, देवराम लिलके, पवन लिलके, अनिल अपसुंदे, संदीप दरगोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा