Saturday, November 16, 2024
HomeनाशिकNashik Political : हा आदिवासी समाजाचा अपमान; आंबेवाडीत उदय सांगळे यांचा घणाघाती...

Nashik Political : हा आदिवासी समाजाचा अपमान; आंबेवाडीत उदय सांगळे यांचा घणाघाती आरोप

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे ५ वर्षांपूर्वी वाजत-गाजत भूमीपूजन करण्यात आले. मात्र, आजपर्यंत तेथे स्मारकाची एकही चीट लागलेली नाही. हा के वळ आद्य क्रांतीकारकांचाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे. स्मारकाच्या नावाखाली आदिवासी समाजाला झुलवत ठेवणाऱ्यांना विधानसभा निवडणूकीत त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aaghadi Candidate) उदय सांगळे (Uday Sangle) यांनी केले.

- Advertisement -

टाकेद जिल्हा परिषद गटातील आंबेवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, खंडू झनकर, मदन वारुंगसे, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, काशिनाथ कोरडे, किरण डगळे, साहेबराव झनकर, समाधान चारुंगसे, भाऊसाहेच वा जे यांच्यासह परिसरातील महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदाची निवडणूक मतदार संघाचे भवितव्य बदलणारी निवडणूक आहे. परिसरातील मतदारांनी (Voter) २० वर्षे आमदार कोकाटे यांना भरभरुन मते दिली. मात्र, आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एकदा निवडणूक झाली की कोकाटे कोणालाही भेटत नाहीत. कोणाच्याही सुख-दुःखात जात नाही. परिसरातील रस्ते, बुद्ध विहारांची अवस्था दयनीय करून ठेवली आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या, कोटी कोटींचे आकडे सांगायचे. मात्र, प्रत्यक्ष गावात कुठल्याही सुविधा बघायला मिळत नाहीत. परिसरातील रस्त्यांची अवस्था धड नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. परिसरात कुठेही क्रीडा संकुल नाही. तरुण मित्रासाठी अभ्यासिका नाही. मग फक्त यांना निवडून देण्यासाठी आपण जन्माला आलोय का असा सवाल उदय सांगळे यांनी केला.

गेल्या २० वर्षात यांनी आंबेवाडीला (Ambewadi) काय दिलं याचा विचार करा. या उलट माझ्यासारखा तरुण तळागाळातला कार्यकर्ता, तुमच्या हाकेला कधीही धावून येणारा असून माझा हात घरुन तुम्ही कुठलेही काम करुन घेऊन शकता. रेशनकार्डचा प्रश्न असेल, जातीचा दाखला असो, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ असो, नाहीतर घरकूल या प्रश्नांसाठी मी सदैव तुम्हाला उपलब्ध असेल. मात्र, हेच तुम्ही विद्यमान आमदारांशी बोललात तर मला मोठी कामे सांगा, या कामात माझा वेळ घेऊ नका अशी उत्तरे त्यांच्याकडून येतात. माझ्या आदिवासींना भेडसावणारी छोटी छोटी कामे कोण पहाणार ? निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांना भूलथापा देण्याचं काम करणाऱ्यांना त्यांची जागा या निवडणूकीत (Election) दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रातील सरकार आदिवासींच्या विरोधात

घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत. देशातल्या आदिवासी बांधवांवर भाजप नेहमीच अन्याय करत आला आहे. मणिपूरला आदिवासी भगिनीवर अत्याचार झाला, तिला जिवे मारण्यात आलं. मात्र, त्यावर केंद्र सरकार काही बोलत नाही. आदिवासींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्यातील आदिवासी आमदारांना मंत्रालयात उड्या माराव्या लागल्या. तरीही राज्यातलं सरकार व केंद्र सरकार या आमदारांना मदत करत नाही. केंद्रातलं भाजपा सरकार आदिवासींच्या विरोधात काम करणारे सरकार असून बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० पार खासदार निवडून आणायचे होते. ज्यांना आपल्या आरक्षणाचं संरक्षण करायचं नाही, त्याना खड्यासारखं बाजूला ठेवण्याची गरज आहे. ‘एक तीर एक कमान, आदिवासी एकसमान अशी परिस्थिती असतांना देशभरातील आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचं काम करणाऱ्यांना निवडणूकीतून हद्दपार करण्याची गरज उदय सांगळे यांनी व्यक्त केली.

सांगळे यांचा टाकेद गटात झंझावती दौरा

महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांचा टाकेद गटातील १६ गावांमध्ये प्रचार दौरा उत्साहात पार पडला. भगवान बिरस्सा मुंडा यांच्या जयंतीनिमिताने दौऱ्यात ठिकठिकाणी उदय सांगळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. गावागावात उदय सांगळे यांची बैलगाडीवर बसवून मिरवणूक काढण्यात आली. गेल्या वीस वर्षात आमचा भ्रमनिरास झाला असून यावेळी आम्ही शरद पवार यांच्यासोबत ठाम राहणार असून उदय सांगळे यांना प्रचंड आघाडी देऊ अशी भावना मतदार गावा-गावात व्यक्त करीत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या