Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Political : पंचवटीतून गणेश गितेंना मोठे मताधिक्य - बागूल

Nashik Political : पंचवटीतून गणेश गितेंना मोठे मताधिक्य – बागूल

मखमलाबाद रोड परिसरात शिवसेनेची (उबाठा) बैठक

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी परिसरातून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून (Nashik East Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश (भाऊ) गिते (Ganesh Gite) यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे (उबाठा) उपनेते सुनील बागूल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी माझी उमेदवारी – मुशीर सय्यद

गणेश गिते यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची (उबाठा) बैठक मखमलाबाद रोड (Makhmalabad Road) येथील नवदुर्गा पॅलेस येथे झाली. त्यावेळी सुनील बागूल बोलत होते. मतदारसंघात फिरत असताना नागरिकांकडून गणेश गितेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विकासाच्या जोरावर आपले उमेदवार शंभर टक्के निवडून येतील, असेही बागूल यांनी सांगितले. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आहे, या भावनेने प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांना विजयी करू, असा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

हे देखील वाचा : Nashik Political : देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत निवडणूक प्रचार नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल, महानगर प्रमुख विलास शिंदे, बाळासाहेब पाठक, मामा राजवाडे, उल्हास भोळे, स्वाती पाटील, महेश बिडवे, राहुल दराडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : झिरवाळांमुळे जांबुटकेत जमिनीला सोन्याचे भाव : अपसुंद

प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजता पंचवटी कारंजा चौक येथे होणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ – जाधव

प्रचाराचा झुंजावात

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघ नगर, विठाई नगर, गजवक्र नगर, पांडुरंग कॉलनी, काकड नगर, देवीवाघेश्वरी सोसायटी, मेहेर बाबा मंदिर परिसर तसेच जेलरोड परिसरातील क्रमांक १८ मधील पंचक गाव, मोरे मळा, बालाजीनगर, सरस्वतीनगर, अयोध्यानगर, अमृतानगर, राजेश्वरी परिसर येथे प्रचार करून पत्रके वाटण्यात आली. यावेळी उज्वला गिते, कल्पेश बोराडे, योगिता काकड, पंकज जाधव, स्वप्निल सोनवणे, राहुल गिते यांसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...