दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात (Dindori Peth Assembly Constituency) अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. विद्यमान आमदारांनी (MLA) विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याऐवजी कोण कुठे नाचले. जातीयवादी आरोप या सारख्या निरंर्थक चर्चेतून प्रचार संपवला, समर्थकांनी झिरवाळांच्या समर्थनार्थ खोटे व्हिडीओ देखील बनवले. त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटल्याने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात झिरवाळांना अपयश आल्याने झिरवाळांवर वाढलेली नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar) यांना विजयी करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाला प्रथम महिला आमदार म्हणून सुनीता रामदास चारोस्कर यांचे नाव निश्चित झाल्याचे बघायला मिळत आहे.
महाविकासआघाडी व महायुतीकडून (Mahavikas Aaghadi and Mahayuti) प्रचार होतांना विविध मुद्यांवर गावागावात चर्चा झाली. महाविकास आघाडीची प्रचाराची धुरा सांभाळणारे श्रीराम शेटे (Shriram Shete) यांची ठरली आहे. विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा आपण कसे पात्र आहोत, त्याचबरोबर आपण जनतेला काय देणार, यावर भर देवून प्रचार केला तर दुसरीकडे महायुतीकडून विद्यमान आमदारांचा प्रचार होताना जातीयवादी मुद्दे, विरोधकांवर चिखलफेक, खोटे समर्थनार्थ व्हिडीओ बनवणे असे जनतेसाठी त्रासदायक कृती घडल्याने जनतेमध्ये नाराजी पसरली असून सुनिता चारोस्कर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. एकंदरीत विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान होवूनही झिरवाळ जनतेच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याने त्यांचा मार्ग खङकर झाल्याची चर्चा आहे.
सुनीता चारोस्करांचा प्रचार जनतेला भावला
महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनीता रामदास चारोस्कर ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये १० वर्षांचा अनुभव आहे. त्यात समाजकल्याण सभापती पद त्यांनी भूषविलेले असून त्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यात आपला नावलौकिक केला आहे. टिकेपेक्षा आपण काय करुन दाखवणार? यावर त्यांनी अधिक भर देत जनतेला आश्वासित केले आहे. विद्यमान आमदार विधानसभा उपाध्यक्ष विराजमान होवून देखील जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करु शकले नाही. त्यामुळे जनतेमध्ये असलेली नाराजी चारोस्करांनी ओळखली. त्या पद्धतीने त्यांनी प्रचारदरम्यान जनतेमध्ये जावून महिला, युवक, युवती, वयोवृध्द यांच्याशी मनसोक्त चर्चा करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि तोच धागा पकडून त्या अडचणी सोडवण्याची शाश्वती सुनिता चारोस्कर यांनी दिली. त्यामुळे कमी वेळात त्यांनी जनतेच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याच धमक सुनिता चारोस्कर दाखवत असल्याने जनतेमध त्यांना पसंती बाढली आहे. याउलट झिरवाळांचा प्रचा जातीयवाद, विरोधकावर आरोप करणे, समर्थकांच सोशलमिडीयाबर हुल्लडबाजी यामुळे जनतेमध् नाराजीचा सुर आहे. शरदचंद्र पवार यांना सोडून अजिर पवारांसोबत जातांना त्यांनी विकासासाठी गेल असल्याचे बतावणी केली होती. परंतू विकासाचा मुह शिखाळांच्या प्रचारात दिसून आला नसल्याने झित्वाव विकास करण्यात अपयशी ठरले असल्याचे सिथ झाल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. त्यामुळे झिरवाळांन अपयश हा चर्चेचा विषय ठरत असून महाविकार आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या तुतार वाजवणारा माणूस’ या निशाणीला पसंती वाढली असल्या दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघामध्ये सुनीत चारोस्कर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
शेटे समर्थक झिरवाळांचा पराभव करण्यावर ठाम
एका सर्व सामान्य नरहरी झिरवाळांना जनतेसमोर झोळी धरून निधी जमा करत आमदार ते विधानसभा उपाध्यक्षपर्यंत नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे हे होय. श्रीराम शेटेंना गुरुची उपमा झिरवाळ देतात. परंतू सध्याच्या निवडणूकीच्या प्रचारामध्ये गुरुंच्या बिरोधकाची हातमिळवणी केल्याने गुरुवरच आरोप होत असतांना झिरवाळ निरुत्तर राहिले. श्रीराम शेटेंबर निष्ठा असलेल्या कार्यकत्याँना पटलेले नाही. त्यामुळे झिरवाळांचा पराभव करण्याचा निश्चय शेटेसमर्थकोनी केला आहे. श्रीराम शेटे यांच्या विचारधारेबरोबर राहण्याऐवजी विरोधात उभे राहणे झिरवाळांनी पसंत केले आहे. त्यात भर म्हणून श्रीराम शेटे यांच्या विरोधकांना जवळ घेत आपल्या गुरुंनाच आवाहन दिले की काय? असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे समर्थक रिशीला पेटले असून नरहरी झिरवाळांना धडा शिकवणारच असा चंग बांधला आहे. ज्या श्रीराम शेटेंनी शुन्यामधून झिरवाळांना पुढे आणले त्यांनाच आवाहन देण्याचे षड्यंत्र रचल्याने जनतेमध्ये देखील प्रचंड नाराजी उमटत आहे. त्यामुळे झिरवाळांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
आंबेडकरी जनतेचा सुनीता चारोस्करांना पाठिंबा
विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना आंबेडकरी समाज फक्त निवडणूकीच्या तोंडावर आठवते. इतरवेळी आमचा त्यांना विसर पडतो. एक दोन जणांना हाताशी धरुन निवडणूकीमध्ये आंबेडकरी समाज माझ्याबरोबर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या प्रयत्नात यंदा त्यांना यश येणार नाही. विधानसभा उपाध्यक्षपदापर्यंत झिरवाळ साहेब पोहचले. त्यावेळी आंबेडकरी जनतेच्या मुलभूत सोयीसुविधांवर त्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. याउलट माजी समाजकल्याण सभापती म्हणून सर्व समाजातील घटकांना न्याय दिलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर याच आम्हाला न्याय देवू शकतील. त्यांना आमच्या प्रश्नांची जाणीव असल्याने नक्कीच त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतील. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आंबेडकरी जनता सुनिता चारोस्कर यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार असून त्यांना विजयी करण्याचा संकल्प आम्ही घेत असल्याचे प्रतिपादन दिंडोरीचे युवा नेते हेमंत पगारे यांनी केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा