सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
निवडून गेल्यानंतर विरोधी उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) हे कधीही टाकेद गटातील (Taked Group) गावांमध्ये फिरकले नाहीत. पाच वर्षे त्यांनी या भागाकडे ढुंकूनही पाहिले नाही. क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची दोनदा भूमिपूजने केली. पण एक वीटही रचली नाही. हा आदिवासी बांधवांचा अपमान असून अशा नेतृत्वाला पराभूत करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे (Uday Sangle) यांनी केले.
टाकेद जिल्हा परिषद गटातील आडसरे बु मध्ये आयोजीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) व मित्र पक्षांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. कोकाटे हे कुणाच्या सुख दुःखात जात नाहीत. त्यामुळे टाकेद गटात त्यांच्या विरोधात खूप रोष आहे. येथील सर्व समाजातील घटकांनी त्यांना पराभूत करण्याचे ठरवले आहे. ही एकजुट कायम ठेवून त्यांना मोठ्या फरकाने पराभूत करा, असे आवाहन उदय सांगळे यांनी केले. टाकेद गटातील कोणतीच विकासकामे ५ वर्षात कोकाटे यांनी केली नाहीत. याउलट आपल्याला संधी मिळाल्यास टाकेद गटातील गावांत अभ्यासिका, व्यायामशाळा यांच्या सुविधांची उभारणी करणार आहे. स्मशानभूमी सभागृह, सभामंडप यासारख्या कामांची गरज आहे. या सुविधा येत्या काळात आपण उभ्या करु. चौरवाडी परिसरातील गावांत तर रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे. हे सस्ते पाहिले तर कोकाटे यांनी ५ वर्षात काय केले, असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे टाकेद गटातील सर्वच रस्ते चांगल्या द जर्जाचे करण्याचे काम आपण करणार आहोत. अतिशय नियोजनबध्द विकास करण्याचे नियोजन मी केले आहे. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज असल्याचे सांगळे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने (BJP) आदिवासी समाजाची घोर फसवणूक केली आहे. आदिवासी समाजाच्या विरोधात हा पक्ष आहे. विरोधी उमेदवार महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) असून घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत दिल्यासारखे होईल. त्यामुळे शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी परिवर्तन घडवा, असे आवाहन सांगळे यांनी केले. भाजपा संविधानात बदल करणार होते. म्हणून लोकसभेत त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली. आता सर्व आदिवासी बांधवांचे ठरले आहे. महाविकास आघाडीला निवडून द्यायचे आहे. आपल्याला राघोजी भांगरे यांचे स्मारक बांधायचे आहे. गावागावात बुध्द विहार उभे करायचे आहेत. अभ्यासिका बांधावयाच्या आहेत. तुम्ही ५ वर्षे कोकाटे यांना संधी दिली. आपल्याला एकदा संधी देवून बघा. विकास काय असतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. विकासाचा अनुशेष आपण भरून काढणार असल्याचे सांगळे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा