Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकNashik Political : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांना आडगावकर धडा शिकवतील - निमसे

Nashik Political : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांना आडगावकर धडा शिकवतील – निमसे

आडगावात ढिकलेंच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

पंचवटी | Panchvati

भूसंपादनाचा (Land Acquisition) मोबदला देताना स्थानिक शेतकऱ्यांच्या (Farmer) जमिनीवरील आरक्षण न घेता धनदांडग्यांना प्राधान्य देऊन स्थानिकांना नडणाऱ्यांना आडगावकर त्यांची जागा दाखवतील, असा दावा स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी केला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील आडगावमध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ‘ड्रग्जमुक्त नाशिक’ लढ्याच्या भितीने आ. फरांदेंविषयी तयार केला जातोय फेक नॅरेटिव्ह

यावेळी ॲड. ढिकले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी (Women) औक्षण करून आशीर्वाद दिले. खासदार शरद पवार यांच्या सभेपूर्वीच आडगावात ॲड. ढिकले यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने विरोधकांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.आडगावातील मारुती मंदिरापासून रॅली निघाली. त्यापूर्वी गावातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते झाले. यावेळी निमसे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतही आडगावमधून ढिकले यांना मताधिक्य मिळाले. त्यापेक्षा अधिक मताधिक्य आडगावसह नांदूर-मानूर भागातून देऊ, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”

दरम्यान, या प्रचार कार्यालय शुभारंभ आणि प्रचार दौऱ्याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, माजी प्रभाग सभापती शीतल माळोदे, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, पुंजाभाई माळोदे, भिकाजी शिंदे यांच्यासह आडगावचे ग्रामस्थ दामू शिंदे, संतोष भोर, उत्तम मते, युवराज झोमान, रामदास नवले, अभय माळोदे, गणेश माळोदे, सतीश माळोदे, डॉ. अशोक भोर, शांताराम गायकवाड, नामदेव शिंदे, माळोदे, कैलास शिंदे, जालिंदर शिंदे, चेअरमन तुकाराम लभडे, प्रभाकर मते, सनी माळोदे, प्रभाकर माळोदे, बाजीराव लभडे, नीलेश म्हस्के, निवृत्ती शिंदे, बाजीराव माळोदे, संदीप लभडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिकला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी वसंत गितेंना विधानसभेत पाठवा – खा. राऊत

प्रकल्पांसाठी ढिकलेच हवे

भाजप सरकारच्या (BJP Government) कार्यकाळात सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा करण्यात आली असून आडगावपासूनच महामार्ग जात आहे. दहावा मैल येथे महामार्गाला इंटरचेंज आहे. याच भागात केंद्र सरकारने लॉजिस्टीक पार्कची घोषणा केली आहे. आमदार ढिकले यांच्या कारकिर्दीत महापालिकेने आयटी पार्क मंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा ढिकले यांच्याचं नेतृत्वाची आवशक्यता असल्याचे नगरसेविका माजी प्रभाग सभापती शीतल माळोदे, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, पुंजाभाई माळोदे, भिमकाजी शिंदे यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या