येवला | प्रतिनिधी | Yeola
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात (Yeola Lasalgaon Assembly Constituency) न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची विकासकामे केली आहेत. मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी मुखेड गटातून मंत्री छगन भुजबळ यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : दहशत रोखण्यासाठी सीमा हिरेंना निवडून द्या; ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांचे मतदारांना आवाहन
विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ (MLA Pankaj Bhujbal) यांनी मुखेड गटात तर त्यांच्या पत्नी विशाखा यांनी देवगाव गटात गाठीभेटी घेत प्रचार केला. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट यांच्यासह महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आमदार पंकज भुजचळ यांनी आज मुखेड गटातील विविध गावांना भेटी दिल्या.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास
यावेळी गावातील नागरिकांशी संवाद साथला. या दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक गावात आमदार पंकज भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत करून महिलांनी औक्षण केले. यापुढील काळात मतदारसंघात (Constituency) मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक विकासाची कामे मतदारसंघात केली जातील, असे आश्वस्त केले.
हे देखील वाचा : ‘बहुरंगी आणि बहुढंगी’ आमदार बदलण्याची वेळ : पाटील
दरम्यान, याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, प्रा. अर्जुन कोकाटे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढबई, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, नितीन गायकवाड, भूषण लाघवे, माधवराव पवार, प्रकाश बोराडे, पोपट बोराडे, सोमनाथ सोनवणे, संतोष लभडे, प्रकाश लभडे, अशोक बुराडे, मच्छिंद्र ठोंबरे, तुळशीराम कोकादे उत्तम घुले, भाऊसाहेब कळसकर, भूषण गोठी यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा : ‘ Nashik News : स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची लगबग; दोन लाख ४० हजार मतदारांना मिळणार ओळखपत्र
विशाखा भुजबळ यांच्या भेटीगाठी
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या स्नुषा विशाखा भुजबळ यांनी आज देवगाव गटात विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. देवगाव गटातील देवगाव, महादेवनगर, वाकद, शिरवाडे, कानळद, कोळगाव, खेडलेझुंगे, सारोळे, नांदूरमध्यमेश्वर, दिंडोरी तास, गाजरवाडी, धारणगाव खडक, धारणगाव वीर, रई, धानोरे आदी गावांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. भुजबळ यांनी केलेल्या विकासकामांबद्दल महिलांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना महिलांनी विशाखा यांच्यासमोर बोलून दाखवली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा