Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंड शमले; डॉ.हेमलता पाटील...

Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंड शमले; डॉ.हेमलता पाटील यांची माघार

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु होते.वरिष्ठ नेत्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून महाविकास आघाडीतील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बंड शमले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून (Nashik Central Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) नाराज झाल्या होत्या. यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत लढण्याचा ठाम निर्धार केला होता. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोन करून पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पंरतु, अर्ज माघार घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

हे देखील वाचा : मोठी बातमी! अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश

दरम्यान, यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना काँग्रेसच्या (Congress) डॉ. हेमलता पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मविआचे उमेदवार वसंत गीते (Vasant Gite) यांना काहीसा दिलासा मिळाला. याशिवाय नाशिक मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले गुलजार कोकणी, हनिफ बशीर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे (Devyani Pharande) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्यात लढत होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या