Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Political : करण गायकर यांच्या विजयासाठी युवराज शहाजीराजेंचा प्रचार दौरा

Nashik Political : करण गायकर यांच्या विजयासाठी युवराज शहाजीराजेंचा प्रचार दौरा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पूर्व मतदारसंघातील (Nashik East Constituency) स्वराज्य पक्षाचे उमेदवार करण पंढरीनाथ गायकर (Karan Gaikar) यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात होते. या रॅलीला युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमुळे उभारी मिळाली. रॅलीची शुभारंभ महात्मा गांधी पुतळा, देवळाली येथून करण्यात आला. नाशिक पूर्व मतदारसंघाच्या प्रमुख रस्त्यांवरून ती मार्गस्थ झाली. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मालेगाव स्टॅण्ड येथे करण्यात आला. जिथे आम्ही शिवरायांच्या आदर्शाची शपथ घेऊन, स्वराज्याच्या दिशेने एकत्र पाऊल टाकणार आहोत, असे करण गायकर जनतेशी संवाद साधताना सांगितले.

- Advertisement -

जनतेशी असलेली बंधने आणि प्रेम करण गायकर यांच्या पायी प्रचार दौऱ्यामुळे नाशिक पूर्वमधील नागरिकांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक वाड्यात करण गायकर यांच्या नावाची चर्चा आहे. तेथील प्रत्येक नागरिकाची (Citizen) एकच भावना आहे आम्ही करण गायकर यांना निवडून देणार, कारण त्यांना फक्त सत्ता मिळवण्याचा हेतू नाही.

YouTube video player

समर्थन आणि पाठिंबा

आपल्याला प्रचारात छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, संजीवनी फाउंडेशन, छावा क्रांतिवीर सेना, युवाशक्ती सेना तसेच जनतेतून व इतर अनेक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला असल्याचे करण गायकर यांनी सांगितले. या सर्वांच्या सामूहिक पाठिंब्यामुळे, करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पूर्वमधील जनतेत एकता आणि सामूहिक जागरूकता निर्माण झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...