Wednesday, April 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray : "महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या..."; आदित्य...

Aaditya Thackeray : “महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या…”; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

नाशिक | Nashik

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर नाशिकमधील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे पार पडत आहे. या शिबिरास संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कुठे चाललाय? या विषयावर भाषण करताना मुंबईतील रस्ते घोटाळा आणि विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ईशान्य मुंबईनंतर नाशिकमध्ये आपले शिबीर होत आहे. आपण खरंतर मैदानातील माणसे आहोत. परंतू, दिशा ठरविण्यासाठी आपली वाटचाल ठरविण्यासाठी जिल्ह्यात, विभागात असे शिबीर झाले पाहिजे. मी कोणत्या विषयावर बोलायचे यासाठी राऊतसाहेबांना फोन केला. त्यावेळी मी म्हणालो, संजयकाका उद्या कोणत्या विषयावर बोलायचं? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोला. मला लहानपणापासून राजकारणाची आवड होती. ७ ते १० वर्षाचा असल्यापासून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा दहावीच्या परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो” अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

पुढे ते म्हणाले की, “आजवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे (CM) पहिले १०० दिवस हनिमून पिरेड म्हटले जात होते. या सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसात काय झाले ते बघा, एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना आता ५०० रुपयांवर आणली. आम्ही तर तीन हजार देणार होतो. एकही गोष्ट अर्थसंकल्पात आणत नाही, याला निर्लज्जपणा म्हणतात. याच्यापैकी कोणीतरी न्यायालयात जाईल आणि न्यायालयातून योजना बंद पाडतील. हे सरकार निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आशीर्वादाने बसलेले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

ते पुढे म्हणाले की, “निवडणूक नसताना कर्जमाफी देणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात सर्वात कडक शक्ती कायदा आणणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. नाशिकमधे स्मार्ट सिटी योजना पूर्ण झाली आहे का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे. जात धर्म, तालुका जिल्हा आशा वादात व्यस्त ठेवले जात आहे. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे तोडा, फोडा आणि राज्य करा, असा राज्य कारभार केला जात आहे. पुण्यात (Pune) एका महिलेवर अत्याचार झाल्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणतात शांततेत पार पडलं, म्हणून कुणाला काही कळले नाही. यावरून हे सरकार तुमचं आहे असं वाटतं का? गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची असून, रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे”, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सरपंचपद आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर; जिल्ह्यात १,३८७ ग्रामपंचायती,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्ह्यातील (District) बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८१० आणि अनुसूचित क्षेत्रातील ५७७ अशा एकूण १,३८७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,...