इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
इगतपुरी नगरपरिषदेवर (Igatpuri Nagarparishad) शिवसेनेची (उबाठा) एकहाती सत्ता होती. मात्र शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे भाजपत (BJP) प्रवेश केला अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंदुलकर यांनी समर्थक व निवडक नगरसेवकांसह चार दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, महेश श्रीश्रीमाळ, शहराध्यक्ष सजन शर्मा यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. नगराध्यक्ष पदासाठी मधुमती मेंद्रे (Madhumati Mendre) यांचे नाव बच्छाव यांनी जाहीर केले.
दरम्यान, आण्णासाहेब डोंगरे, सुनील रोकडे, संपत डावखर, आण्णा पवार, मुन्ना पवार, सुरेश संधान, सचिन उघाडे, निखील हांडोरे, संतोष बाफना महेमुद शेख, योगेश चांदवडकर, राहुल पंडीत, वैशाली आडके, दिपा रॉय यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.




