Sunday, January 18, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं;...

Nashik Politics : महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळताच भाजप शहराध्यक्षांनी शिंदे सेनेला डिवचलं; म्हणाले, “आता त्यांनी विरोधी…”

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Nashik Municipal Coroporation Election) भाजपने (BJP) ७२ जागा मिळवत स्पष्ट बहुमतासह सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. बहुमताचा जादुई आकडा पार करत भाजप स्वबळावर महापौरपदासह सर्व पदांवर दावा ठोकू शकतो. मात्र, महायुतीतील सहकारी शिंदेसेनेला सत्तेत सहभागी करून घेणार का? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदेसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका करत डिवचलं आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

YouTube video player

आमची शिवसेनेला (Shivsena) सोबत घेऊन जाण्याची तयारी होती. निवडणुकीनंतरही सहकार्याचा विचार होता. मात्र निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने स्वबळाचा नारा देत स्वतंत्र लढतीचा निर्णय घेतला. तरीसुद्धा निकालानंतर भाजपने समन्वयाची भूमिका घेतली होती, असे केदार म्हणाले. मात्र माध्यमांतूनच शिंदेसेनेच्या नेत्यांनी आपण विरोधी बाकांवर बसणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपला ही भूमिका अपेक्षित नव्हती. राज्यात आम्ही एकत्र सत्तेत आहोत आणि विकासासाठी सहयोगाची अपेक्षा होती. पण त्यांनी आधीच भूमिका जाहीर केल्याने आता त्यांनी विरोधी पक्षाची जबाबदारी स्वीकारावी, असा थेट टोला शहराध्यक्ष केदार यांनी लगावला.विरोधी पक्षात बसताना केवळ विरोधासाठी विरोध न करता शहराच्या चांगल्या कामांना साथ द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. या विधानामुळे भाजप सत्तास्थापनेबाबत कोणतीही घाई किंवा दबाव स्वीकारण्याच्या मनः स्थितीत नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

दरम्यान, या विषयावर शिंदेसेनेचे नेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांना विचारले असता त्यांनी निर्णयाचा चेंडू थेट राज्य नेतृत्वाकडे ढकलला. राज्यभरात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यात आल्या आहेत.आता पुढील दिशा काय असावी, याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. हा निर्णय केवळ नाशिकपुरता मर्यादित नसेल, तर संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा असेल, असे त्यांनी यांनी सांगितले. एकीकडे भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी सज्ज असताना, दुसरीकडे शिंदे सेनेने विरोधी बाकांवर बसण्याची आग्रही भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक मनपातील सत्ता समीकरणा बरोबरच राज्य पातळीवरील युतीच्या भवितव्यावरही या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा :  Nashik MC Election : तब्बल ‘एवढे’ नवीन चेहरे पहिल्यांदाच करणार महापालिकेत प्रवेश; वाचा प्रभागनिहाय यादी

ताज्या बातम्या

अपघात

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू, एक...

0
सोलापूर | Solapurपुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH-65) शनिवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला आहे. पनवेलहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या कारला रात्री साधारण...