Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : … तर 'डंके की चोट पे' पक्षप्रवेश करू; काँग्रेसच्या...

Nashik Politics : … तर ‘डंके की चोट पे’ पक्षप्रवेश करू; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे स्पष्टीकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Dr.Hemlata Patil) या आज (मंगळवार) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. तसेच तीन माजी नगरसेवक देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात दोन दिवसांपासून सुरु आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल (Shirish Kumar Kotwal) हे भाजपमध्ये (BJP) जाणार! असे वृत्त येऊन धडकले. मात्र, अशा प्रवेशाचे खंडन करत कोतवाल यांनी जर पक्षाला सोडचिठ्ठी द्यायचीच असेल आणि भाजपात प्रवेश करायचाच असेल तर ‘डंके की चोट पे’ प्रवेश (Join) करू, असे स्पष्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. शहरापुरतेच मर्यादित असलेल्या या प्रवेशाचे लोण आता ग्रामीण भागापर्यंतही (Rural Area) पोहोचले आहे. पुत्र राहुल यांच्या राजकीय भविष्यासाठी कोतवाल भाजपत प्रवेश करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे असल्यानेच त्यांच्या राजीनाम्याची आणि भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कोतवाल यांनी जिल्हाध्यक्षपदाबाबत (District President) आपल्याला स्वारस्य नसून यातून आपल्याला मुक्त करावे, असे पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे स्पष्ट केले आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतचे वृत्त पक्षांतर्गत विरोधकांकडून खोडसाळपणे पसरविले जात आहे. अशाप्रकारे प्रवेश करायचाच असेल तर आपण पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, मात्र, अशा प्रकारचे वृत्त पसरवणे हा पक्षांतर्गत खोडसाळपणा आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...