नाशिक | Nashik
आज (सोमवारी) नाशिकमध्ये (Nashik) शिवसेना (शिंदे गट) पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचा (Ahilyanagar) आढावा घेणारी बैठक झाल्यानंतर मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी दोन गट एकमेकांसमोर आल्याने जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर हे प्रकरण थेट शिवीगाळ आणि कॉलर पकडण्यापर्यंत गेल्याने काहीवेळ बैठकस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shinde Shivsena) काही पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शिरल्याचा आरोप केला. त्यानंतर यावरुन थेट दोन गट एकमेकांना भिडले आणि जोरदार राडा झाला. यानंतर पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. मात्र,त्याआधी हे प्रकरण थेट शिवीगाळ आणि कॉलर पकडण्यापर्यंत गेले.
दरम्यान, अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्यात हा वाद झाला असून, नगर जिल्ह्यासंदर्भातील बैठक झाल्यानंतर हा राडा झाला. हा पदाधिकारी बैठकीत (Metting) कसा आला , याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या राड्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे.
दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ” ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे कृत्य केले, त्याची दखल घेतली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा आढावा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल. किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झाले आहे. स्वतःच्या प्रसिद्धसाठी त्यांनी बैठकीतील सांगणे हे उचित नाही. आम्ही त्यांना समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती”, असे सांगितले





